Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : पावसाच्या दडीमुळे खरीप पेरण्या खोळंबल्या

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात यंदा उन्हाळी पावसाने दडी मारली. पावसाचे रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. आता मृग नक्षत्र सुरू झाले आहे. परंतु अद्यापही पावसाला सुरुवात झाली नाही. परिणामी, पावसाच्या दडीमुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे.

जिल्‍ह्यात कृषी विभागाने खरिपाची तयारी पूर्ण केली आहे. बियाणे, खतांची मागणीही केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती पूर्ण केल्या आहेत. परंतु उन्हाळ्यात वळवाचा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे.

कृष्णा आणि वारणा नदीच्या क्षेत्रात वसलेला आहे. अनेक ठिकाणी विविध पाणी योजना आहेत. हे खरे असले तरी आता पाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. नदीच्या पाण्याच्या योजना होण्याअगोदर शेतकरी आपापल्या विहिरीवर बागायत शेती करीत होते.

खरीप पिकांच्या वाढीसाठी मॉन्सूनचा पाऊस उपयोगी असतो. कृत्रिमरीत्या त्याची पाण्याची पूर्तता केली, तरी त्याला पावसाच्या पाण्यासारखी सर येत नाही. जमिनीची तहान पावसाच्या पाण्याशिवाय भागत नाही.

वाळवा तालुक्यात उसाच्या नगदी पिकाबरोबर सोयाबीन, भुईमूग अशी पिके घेतली जातात. तालुक्याच्या पश्‍चिम भागात काही प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र असल्याने त्या ठिकाणी भात, ज्वारी, सोयाबीन अशा पिकांची पेरणी केली जाते.

पावसाने दडी मारल्याने या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातही शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे.

खरीप हंगाम सुरू झाला तरी, शेतकरी बियाणे, खते खरेदीची लगबग सुरू करतो. घरातील बियाण्यांची उगवणक्षमता तपासतो. बीजप्रक्रिया करण्याचे नियोजन करत असतो. शिराळा तालुक्यात धूळवाफेवर भाताची पेरणी सुरू झाली आहे. मात्र एप्रिल, मे महिन्यांत उन्हाळी पावसाने दडी मारली. त्यामुळे भात पिकास पाण्याची आवश्यकता आहे.

त्याच कृष्णा काठी आगाप सोबायीनचा पेरा होतो. परंतु पावसाने दडी मारली असल्याने पेरा रखडला आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षा करत असून, वेळेवर पाऊस सुरू झाला नाही, तर पेरणी कशी सुरू करायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT