Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सांगोल्यात खरिपाची ३७ हजार ९७५ हेक्टरवर पेरणी अपेक्षित

Kharif Season : सांगोला तालुक्याचे खरिपाचे सरासरी २२ हजार ७१९ हेक्टर क्षेत्र असून, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये ३७ हजार ९७५ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे.

Team Agrowon

Solapur News : सांगोला तालुक्याचे खरिपाचे सरासरी २२ हजार ७१९ हेक्टर क्षेत्र असून, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये ३७ हजार ९७५ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. खरिपासाठी १६ हजार ६७६ मेट्रिक टन रासायनिक खताचा कोटा मंजूर झाला आहे. खते, बियाणांसह खरिपाचे पूर्वनियोजन कृषी विभागाने केले आहे.

तालुक्यामध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामे चालू सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांनी जसजशी शेतातील पिके निघतील तसतसे नांगरणी, फटाटणी केली आहे. शेतकरी सध्या परंपरागत बैल जोड्यांपेक्षा ट्रॅक्टरनेच मशागत करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. उन्हाळ्यात लवकर मशागत केल्यास जमिनीमधील तण कमी होते.

सध्या तालुक्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस सुरू आहे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकरी राजा तयार असला, तरी कृषी विभागानेही खरिपाची तयारी केली आहे. तालुक्यात मुख्यतः मका, सूर्यफूल, बाजरी व कडधान्य पिकांची पेरणी केली जाते. तालुक्यात २२ हजार ७१९ हेक्टर सरासरी खरिपाचे क्षेत्र असून, या वर्षी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये ३७ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे.

खरीप हंगामासाठी रासायनिक खताची टंचाई होऊ नये याची काळजी कृषी विभागाने घेतली आहे. तालुक्यासाठी या वर्षी खरिपासाठी १६ हजार ६७६ रासायनिक खताचा कोटा मंजूर झाला आहे. गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुका स्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या हाती येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानांमधून बियाणे घ्यावेत, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

खरीप हंगामातील प्रस्तावित क्षेत्र पीकनिहाय पुढीलप्रमाणे ः

बाजरी १५ हजार हेक्टर

मका १७ हजार ५०० हेक्टर

सूर्यफूल २ हजार हेक्टर

तूर १ हजार २५० हेक्टर

उडीद ७५० हेक्टर

मूग ५०० हेक्टर

भुईमूग ५०० हेक्टर

सोयाबीन ३०० हेक्टर

कापूस २५० हेक्टर

मटकी १२५ हेक्टर

एकूण ३७ हजार ९७५ हेक्टर

खरीप हंगामासाठीची पूर्वतयारी झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी करताना काळजी घ्यावी, बॅगवरील किमतीपेक्षा कोणीही जास्त किंमत देऊ नये, पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावरच बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
-शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT