Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : जोरदार पावसामुळे खरीप पेरणीला ब्रेक

Kharif Season : सांगली जिल्ह्यात जून महिन्यापासून खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत ५ हजार २४५ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात जून महिन्यापासून खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत ५ हजार २४५ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे. पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात सर्वदूर पूर्वमोसमी जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले असून वाफसा नसल्याने खरीप हंगामातील पेरणीला ब्रेक लागला आहे.

जिल्ह्यात खरिपाचे २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर इतके सरासरी क्षेत्र आहे. शिराळा तालुक्यात रोहणी नक्षत्रावर धूळवाफेवर भाताची पेरणी सुरू होते. यंदाही या नक्षत्रावर भाताची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. आजअखेर ४ हजार १८० हेक्टरवर भाताची पेरा झाला आहे. तसेच दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यात मूग, उडदाची पेरणी करण्यात आली आहे.

जून महिन्याच्या एक तारखेपासून पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे आगाप पेरणी केलेल्या भात, मूग, उडीद, सोयाबीन भुईमूग पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरत आहे. बहुतांश भागात शेतकरी सोयाबीन, भुईमूग पिकांची टोकणीचे नियोजन करत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, गेल्या दहा-अकरा दिवसांपासून जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा काठासह दुष्काळी तालुक्यातही जोरदार पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, जोरदार पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी थांबली आहे. शेतकरी वाफसा येण्याची प्रतीक्षा करू लागला आहे. खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, कडेगाव या तालुक्यांत अजूनही शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या तालुक्यासह अन्य तालुक्यांत पावसामुळे खरिपातील पिकांच्या पेरणीला ब्रेक लागला आहे.

२ लाख ५५ हजार क्षेत्र पेरणीखाली येणार

यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर इतके सरासरी क्षेत्र पेरणीखाली येणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खते व बियाण्यांची टंचाई भासू नये यासाठी काळजी घेतली आहे. खरिपातील विविध पिकांसाठी २९ हजार २९९ क्विंटल बियाणे, तर १ लाख ८१ हजार १०० टन खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

खरीप हंगामातील तालुकानिहाय झालेला पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

मिरज ४२

जत १०१७

शिराळा ४१७०

पलूस २५

एकूण ५२५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT