Kharif Season 2023 : खरिपात खते बियाण्यांची टंचाई नको, आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करा

Dr. Anil Ramod : अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. रामोड : मॉन्सूनपूर्व आढावा बैठक
Kharif Season 2023
Kharif Season 2023Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune News :
मॉन्सूनपूर्व सर्व जिल्ह्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा अद्ययावत ठेवावा, तसेच दुर्गम भागातील अतिवृष्टीमुळे होणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याबरोबरच स्थानिक ग्रामस्थांच्या स्थलांतरासाठीच्या पर्यायी जागांच्या व्यवस्थांचे नियोजन करा. पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी धरणांतील पाणीसाठा आणि पाणी सोडण्याचे योग्य नियोजन केले जावे.

तसेच खरिपात शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची टंचाई (Seed, Fertilizer shortage ) होणार नाही याबाबतच्या खबरदारी घ्याव्यात, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिल्या.

पुणे विभागाची मॉन्सूनपूर्व आढावा बैठक विधानभवन येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या वेळी पुणे शहर विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त ए. राजा, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजकुमार मगर, विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त रामचंद्र शिंदे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदींसह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दूरदृश्‍यप्रणालीद्वारे सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्‍ंह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, पोलिस अधिकारीदेखील उपस्थित होते.

Kharif Season 2023
Kharif Season 2023 : खरिपासाठी ३२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

डॉ. रामोड म्हणाले, ‘‘आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सर्व जिल्ह्यांना वितरित केलेल्या बोटी, तसेच इतर साहित्य सुसज्ज ठेवावे. आपत्तीप्रसंगी उपयोगात येऊ शकणाऱ्या जेसीबी, पोकलेन आदी यंत्रसामग्रीची यादी अद्ययावत ठेवावी.

संभाव्य दरडप्रवण गावे, तसेच भूस्खलनप्रवण गावांत संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात. पूरप्रवण गावातील नागरिकांना आपत्तीच्या काळात आवश्यकता पडल्यास स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी निवारा निश्‍चित करावा.

पावसामुळे संपर्क तुटणारी गावे, दुर्गम भागातील गावांना आवश्यकता असल्यास सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे अन्नधान्य आगाऊ देण्याची व्यवस्था करावी.

पुरेसा राखीव धान्यसाठा ठेवावा. लोणावळा, भोर, सातारा जिल्ह्यांतील कास, ठोसेघर, वेण्णा तलाव आदी पावसाळी पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होऊन दुर्घटना होऊ नयेत यासाठी पोलिस विभागाने काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Kharif Season 2023
Kharif Season 2023 : शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करून द्या

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत २०१९ मध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे धरणातून सोडला जाणारा पाण्याचा विसर्ग आदीच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने कर्नाटकसोबत योग्य पद्धतीने आंतरराज्य समन्वय ठेवावा.

पूरपरिस्थितीत जनावरांना स्थलांतरित करावे लागू शकते. त्यासाठी निवाऱ्याची जागा, चाऱ्याच्या व्यवस्थेचे नियोजन करावे. पशुसंवर्धन विभागाने पशुधनाचे ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण तसेच जनावरांचे अन्य पावसाळी आजारांचे लसीकरण मॉन्सूनपूर्वी करून घ्यावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.


प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा ठेवावा. आरोग्य पथके सुसज्ज ठेवावीत. नदीवरील पाणीपुरवठा योजना सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी. कृषी विभागाने पुरेसा बियाणेसाठा उपलब्ध ठेवावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com