Kharip Crop Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharip Crop Loan : खरिपाचे कर्जवाटप पन्नास टक्क्यांच्या पुढे

Loan Allocation : लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी निश्चित करण्यात आलेल्या पीक कर्ज वाटपात प्रमुख बँकांनी पुढाकार घेतल्यामुळे कर्ज वाटपाचा टक्का पन्नासच्या पुढे गेला आहे.

Team Agrowon

Latur News : लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी निश्चित करण्यात आलेल्या पीक कर्ज वाटपात प्रमुख बँकांनी पुढाकार घेतल्यामुळे कर्ज वाटपाचा टक्का पन्नासच्या पुढे गेला आहे. नेहमीप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वाटपात आघाडी घेतली असून आतापर्यंत ६५० कोटीचे वाटप करून उद्दिष्टाच्या ७६ टक्के काम केले आहे. तर अग्रणी बँक म्हणून काम करत असलेल्या भारतीय स्टेट बँकेने यंदा पहिल्यांदाच कर्ज वाटपात आघाडी (लीड) घेतली असून २३३ कोटीचे वाटप करत ४५ टक्के उद्दिष्ट गाठले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दोनशे कोटीचे उद्दिष्ट साध्य करून सर्वाधिक ७८ टक्के वाटप केले आहे. पीक कर्जाचे नूतनीकरण व वाटप अजून सुरूच असून यंदा मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप होण्याची आशा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मिळून यंदा तीन हजार कोटीच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पाऊस चांगला झाल्यामुळे बँकांनीही हात ढिल्ला सोडत कर्ज वाटपाला सुरवात केली आहे. यातूनच जूनमध्ये वाटपाचे अर्ध्यापेक्षा जास्त उद्दिष्ट ओलांडले गेले आहे. जिल्ह्यात डेव्हलपमेंट क्रेडीट बँक, इंडस्लड बँक, कोटक महिंद्रा बँक, एयू व एक्वीटास या बँकांनी अद्याप एक रुपयाही कर्ज वाटप केले नाही. मागील काही वर्षात या बँकांकडून कर्ज वाटपाला काहीच प्रतिसाद मिळत नाही.

तरीही बँकांविरूद्ध काहीच कारवाई होत नसल्याने अन्य बँकावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. इंडियन ओव्हरसिंज बँकेने ४३ टक्के, बँक ऑफ बडोदाने २८ व बँक ऑफ महाराष्ट्रने ३४ टक्के वाटप केले आहे. उर्वरित बँकांचे वाटप एक ते १९ टक्क्या दरम्यान आहे. जुलै अखेरपर्यंत कर्ज वाटप सुरू रहात असल्याने या बँकांकडूनही उद्दिष्टानुसार वाटप होण्याची, आशा जिल्हा प्रशासनाला आहे.

खरिपातील कर्ज वाटप

उद्दिष्ट दोन हजार ४०० कोटी

आतापर्यंत वाटप एक हजार २०७ कोटी

लाभार्थी शेतकरी एक लाख ३३ हजार ९४८

उद्दिष्टाच्या तुलनेत वाटप ५० टक्के

शेती आणि शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून त्यांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात कर्ज देण्याची बँकांची जबाबदारी आहे. खरीप हंगामात सर्व गरजू व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज देऊन उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावीत. शेतीशी निगडित उद्योग व व्यवसायासाठी विविध सरकारी योजनांतून आलेल्या प्रस्तावावर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्यावा. पीक कर्ज व कृषी व्यवसायाशी निगडित कर्ज वाटपाचा यापुढे नियमित आढावा घेण्यात येणार आहे.
वर्षा ठाकूर - घुगे, जिल्हाधिकारी, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Procurement Target: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राने गहू खरेदीचे उद्दिष्ट १५ टक्क्यांनी वाढवले

Dairy Farming Challenges: टंचाईचा फेरा, आधी चारा पेरा

Goda to Narmada Jalyatra: जल चळवळीतील कार्यकर्ते, संस्थांचा विसर

Agriculture Campaigns: खरीप हंगामासाठी राज्यात १८ मोहिमा राबविणार

Climate Resilient Farming: मराठवाड्यात उत्पादकता वाढीसाठी होणार हवामानानुकूल सुधारणा

SCROLL FOR NEXT