Parbhani News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामानाकुल कृषी प्रकल्प ः पोकरा) अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांच्या परभणी जिल्ह्यात बुधवार (ता. ६) अखेर ८ हजार २४५ महिला शेतकरी लाभार्थी आहेत. या महिला शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे (डीबीटी) बँक खात्यावर ३३ कोटी ३३ लाख १६ हजार रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले आहे.
पोकराअंतर्गत जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी महिला शेतकरी लाभार्थीची संख्या २०.२७ टक्के आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे यांनी दिली. पोकरा अंतर्गत एकूण ३ टप्प्यात परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील २५६ ग्रामपंचायती अंतर्गत २७५ गावांची निवड झालेली आहे. या गावांतील ६६ हजार २६७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६३ हजार ७१२ शेतकऱ्यांची पडताळणी झाली.
या शेतकऱ्यांनी बीजोत्पादन, तुती लागवड, तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन, शेततळे, शेडनेटगृह, हरितगृह, मत्स्यपालन, विहीर खोदकाम, विहीर पुनर्भरण, कृषी पंप, पाइप, फळबाग लागवड, रेशीम शेती, शेळीपालन, व्हर्मिकंपोस्ट आदी वैयक्तिक घटकांच्या लाभासाठी १ लाख ९१ हजार ८७३ अर्ज केलेले आहेत.
अनुदानासाठी आवश्यक त्या पडताळणीनंतर बुधवार (ता. ६) पर्यंत थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीद्वारे जिल्ह्यातील महिला व पुरुष मिळून एकूण ४० हजार ६७० शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १३८ कोटी ८३ लाख रुपये अनुदान जमा करण्यात आले. त्यात महिला शेतकरी लाभार्थ्यांची संख्या ८ हजार २४५ (२०.२७ टक्के) असून अनुदानाची रक्कम ३३ कोटी ३३ लाख १६ हजार रुपये (२४ टक्के) आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
‘पोकरा’अंतर्गत घटकनिहाय महिला शेतकरी लाभार्थी, अनुदान रक्कम (कोटींत)
घटक महिला लाभार्थी संख्या अनुदान रक्कम
तुषार संच ३७४४ ६.९०
ठिबक संच १२५४ १०.०१
फळबाग लागवड ७१६ २.७७
बीजोत्पादन १४९७ १.६२
शेडनेट हाउस ३९ ४.४६
वैयक्तिक शेततळी ४८ १.०७
विहिरी १९६ ३.९६
पॉलिहाउस ५ ०.७०
कृषी यांत्रिकीकरण ६७ ०.६०
विहिरी ३३७ ६.५०
वॉटरपंप १६२ ०.२२
पाइप्स ३३० ०.६४
रेशीम शेती १५ ०.८
शेडनेट साहित्य २८ ०.३१
कंपोस्ट खत युनिट १५ ०.९८
शेततळे अस्तरीकरण ७ ०.५
शेतीशाळा यजमान शेतकरी ९७ ०२
शेळीपालन २ ०.१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.