Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Damage : खरीप पिके वाया, रब्बीची पेरणीही खोळंबली

Rabi Sowing : दुष्काळाच्या ट्रिगर-एकमधील दक्षिण सोलापूर तालुका ट्रिगर-दोनमध्ये वगळण्यात आला. परंतु, तालुक्यातील रब्बीच्या ४२ हजार हेक्टरपैकी केवळ १४ हजार ७२० हेक्टरवरच पेरणी होऊ शकलेली आहे.

Team Agrowon

Solapur News : दुष्काळाच्या ट्रिगर-एकमधील दक्षिण सोलापूर तालुका ट्रिगर-दोनमध्ये वगळण्यात आला. परंतु, तालुक्यातील रब्बीच्या ४२ हजार हेक्टरपैकी केवळ १४ हजार ७२० हेक्टरवरच पेरणी होऊ शकलेली आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, आता मायबाप सरकार अडचणीतील बळिराजाला दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वरुणराजाच्या कृपेने खरिपातून काहीतरी हाती लागेल आणि दिवाळी आनंदात होईल, असे स्वप्न पाहणाऱ्या बळिराजाला पावसाअभावी नुकसान सोसावे लागले. त्यानंतर परतीचा तरी चांगला पाऊस होईल आणि रब्बी पिकांची पेरणी करता येईल, या आशेवरील बळिराजाचा पुन्हा एकदा पावसाने अपेक्षाभंग केला. अशी वस्तुस्थिती दक्षिण सोलापूरसह सर्वच तालुक्यात आहे. रब्बीच्या जिल्ह्यात आता खरीप पिकांची लागवड वाढली आहे.

दरवर्षी जिल्ह्यात २५ ते ३५ हजार हेक्टरवर उसाची लागवड वाढते. परंतु, यंदा पावसाअभावी उसाची लागवड घटली असून, संभाव्य टंचाईचा अंदाज घेऊन अनेकजण जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस राखून ठेवत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात यंदा १२०० हेक्टरवर उसाची लागवड होईल असा अंदाज होता.

परंतु, पाऊस नसल्याने केवळ ४०० हेक्टरवर नवीन उसाची लागवड झाली. तालुक्याची पाणीपातळी ०.७३ मीटरने खालावली आहे. नदीचे पात्र कोरडे पडले आहे अशी चिंताजनक स्थिती असतानाही तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी म्हणून खासदार, आमदार व माजी आमदार यशस्वी पाठपुरावा करतील का, याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

दक्षिण सोलापूर ‘रब्बी’ची स्थिती

रब्बीचे एकूण क्षेत्र ४१,७४४ हेक्टर

सध्या प्रत्यक्ष पेरणी १४,७२० हेक्टर

ज्वारीचे क्षेत्र २४,४६७ हेक्टर

प्रत्यक्षातील पेरणी १३,१०५ हेक्टर

दक्षिण सोलापूर तालुक्यात जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याची सद्य:स्थिती व संभाव्य टंचाई, खरीपातील नुकसान व रब्बीची पेरणी अशा सर्व बाबींचा वस्तुनिष्ठ अहवाल संबंधित विभागाकडून मागविण्यात आला आहे. दुष्काळजन्य स्थिती तालुक्यात असून त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जात आहे.
- किरण जमदाडे, तहसीलदार, दक्षिण सोलापूर
तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि आता रब्बीची पेरणीही खोळंबली आहे. जनावरांचा चारा, शेतकऱ्यांना भरपाई व दुष्काळी सवलती निश्चितपणे मिळतील. सरकारकडे माझा पाठपुरावा सुरू असून मला खात्री आहे, राज्य सरकार बळिराजाच्या हिताचा सकारात्मक निर्णय घेईल.
- सुभाष देशमुख, आमदार.
चुकीच्या आणेवारीमुळे तालुक्यावर सातत्याने अन्याय झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. जे तालुके दुष्काळाच्या यादीत नाहीत, तेथे दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील सकारात्मक निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडतील. त्यांना निवेदन देऊन आमची पुढील भूमिका ठरेल.
- दिलीप माने, माजी आमदार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT