Rabi Sowing : खानदेशात रब्बी हंगामातील पेरणी रखडत

Rabi Season : खानदेशात रब्बी हंगामात कोरडवाहू दादर ज्वारी, हरभरा आदी पिकांची पेरणी तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीच्या क्षेत्रात काळ्या कसदार जमिनीत मागील सात ते आठ दिवसांपासून सुरू आहे.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगामात कोरडवाहू दादर ज्वारी, हरभरा आदी पिकांची पेरणी तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीच्या क्षेत्रात काळ्या कसदार जमिनीत मागील सात ते आठ दिवसांपासून सुरू आहे. पेरणी रखडत सुरू असून, सुमारे १५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

खानदेशात एकूण पावणेचार लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी अपेक्षित आहे. जळगावात सुमारे पावणेतीन लाख हेक्टर, धुळ्यात ६० ते ६५ हजार हेक्टर आणि नंदुरबारात ४० ते ४५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल, अशी अपेक्षा आहे. कोरडवाहू दादर ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी तापी नदीच्या क्षेत्रात जळगाव, चोपडा, यावल, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात सुरू आहे.

हरभऱ्याची पेरणीदेखील सुरू आहे, परंतु ही पेरणी रखडत सुरू आहे. कारण अनेक शेतकऱ्यांचे मका, सोयाबीनखालील क्षेत्र रिकामे होऊन त्याची पूर्वमशागत झालेली नाही. यातच यंदा ओलावा अनेक भागात कमी आहे. यामुळे कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी कमी होईल, असे दिसत आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बीची केवळ १५ टक्केच पेरणी

दादर ज्वारीची पेरणीदेखील कमीच राहील, परंतु अनेक शेतकरी मका, कांदाएेवजी ज्वारीलाही पसंती देतील. यामुळे ज्वारीची पेरणी मागील हंगामाच्या तुलनेत फारशी घटणार नाही, असे सांगितले जात आहे. खानदेशात हरभरा प्रमुख रब्बी पीक असून, यंदा पेरणी कमी होईल किंवा मागील हंगामाच्या तुलनेत कमी राहू शकते.

शेतकरी सोयाबीन, मका, उडीद, मूग या पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात कोरडवाहू दादर ज्वारी व हरभऱ्याची पेरणी करीत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग या पिकांखाली रिकाम्या झालेल्या काळ्या कसदार जमिनीच्या क्षेत्रात ओलावा बरा आहे. परंतु मका पिकाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रातील ओलावा कमी असल्याने पेरणीबाबत शेतकरी जोखीम टाळत आहेत.

काही शेतकऱ्यांनी आता शेत भिजवून पेरणीचे नियोजन केले आहे. यात काही भागात पूर्वमशागतीसाठी ट्रॅक्टर, मजुरांची समस्या यामुळे विलंब लागत आहे. अशातच ओलावा आणखी कमी होत आहे. मागील आठवड्यात पेरणी सुमारे आठ टक्के झाली होती. त्यात या आठवड्यात फारशी वाढ झालेली नाही.

Rabi Sowing
Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्बीची आठ टक्के पेरणी

यंदा नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पेरणी १०० टक्क्यांपेक्षा कमी होईल, असा अंदाज आहे. कारण ओलावा कमी आहे. धुळे, नंदुरबार, जळगावात हलक्या, मुरमाड क्षेत्रातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी जानेवारी, फेब्रुवारीतच कमी होण्याचा धोका आहे. यामुळे कांदा लागवड घटली आहे.

गहू, मका लागवड सुरूच नाही

यंदा गहू, मका लागवडीस अद्याप प्रारंभ झालेला नाही. अनेक शेतकरी कापूस पीक डिसेंबरमध्ये काढून त्यात मका, गहू पेरणी करतात. यंदा कापूस पिकात वेचणी सुरू आहे. ही वेचणी डिसेंबरपर्यंत सुरू राहील. यामुळे पुढे गहू, मका लागवडीस विलंब होणार आहे. रावेर, यावल तालुक्यात काही शेतकऱ्यांनी केळीची काढणी ९० टक्के पूर्ण झाल्याने त्यात मका लागवड केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com