Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop : पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील पिके संकटात

Kharif Sowing : यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी वेगाने पेरण्या उरकल्या. मात्र काही भागांत पावसाने खंड दिला असून, उगवलेली कोवळी पिके मान टाकण्याच्या मार्गावर आहेत.

Team Agrowon

Latur News : यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी वेगाने पेरण्या उरकल्या. मात्र काही भागांत पावसाने खंड दिला असून, उगवलेली कोवळी पिके मान टाकण्याच्या मार्गावर आहेत. काही भागांत पिकांची वाढ खुंटली असून, या पिकांना वन्यप्राण्यांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामाची पेरण्या अनेक वर्षांनंतर मृग नक्षत्रात झाल्या. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे चांगले पीक येण्याची आशा शेतकऱ्यांना होती. हवामान विभागानेही यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली होती.

यामुळे पावसाबाबत शेतकरी यंदा थोडे निश्‍चित असताना गेल्या काही दिवसांत पाऊस गायब झाला आहे. यामुळे हलक्या रानावरील पिकांची चिंता शेतकऱ्यांना सतावत असून, कोमेजून जात असलेल्या पिकांना कोळपणी करून सावरण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहेत.

दुसरीकडे काही भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून हरिण, मोर, रानडुकर या प्राण्यांकडून कोवळी पिके उद्ध्वस्त केली जात आहेत. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडताना दिसत नाहीत. कधी कडक ऊन तर कधी पावसासारखे ढगाळ वातावरण आहे. आकाशात पावसाच्या ढगांचा वावर असला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT