Organic Farming Agowon
ॲग्रो विशेष

Organic Fertilizer : जैविक खतांचा वापरासाठी जाणीवजागृती करा

Kharif Season 2025 : खरीप हंगामात बोगस बियाण्यांचा प्रसार थांबवा. खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही त्यादृष्टीने दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी जैविक खतांचा अधिकाधिक वापर करावा यासाठी व्यापक जाणीवजागृती करावी.

Team Agrowon

Parbhani News : खरीप हंगामात बोगस बियाण्यांचा प्रसार थांबवा. खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही त्यादृष्टीने दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी जैविक खतांचा अधिकाधिक वापर करावा यासाठी व्यापक जाणीवजागृती करावी. जिल्ह्यामध्ये कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

मंगळवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम २०२५ नियोजन जिल्हास्तरीय आढावा बैठकीत दूरदृश्‍यप्रणालीद्वारे पालकमंत्री साकोरे बोर्डीकर बोलत होत्या. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा‍ अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी एस. के. नवसारे, कृषी उपसंचालक एस. एम. जाधवर,

आत्मा प्रकल्प उपसंचालक ए. एस. घोडके, जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे (परभणी), लक्ष्मण शिंदे (जिंतूर), गणेश कोरेवाड (मानवत), गोविंद कोल्हे (पाथरी), प्रियांका कावरे (सोनेपेठ),पांडुरंग निरस (गंगाखेड), आबासाहेब देशमुख (पालम), तंत्राधिकारी पूजा थिटे (सांख्यिकी), मुकुंद खिस्ते (विस्तार), बाळासाहेब गाढवे (फलोत्पादन) विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, की जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी टप्प्याटप्प्याने रासायनिक खताचा वापर कमी करून जैविक खतांचा वापर वाढविण्यावर शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. जिल्ह्यात तुती लागवडीला चालना द्यावी.

शेतकऱ्यांनी त्यामध्ये रस दाखवावा. दोन हजार एकरांवर तुती लागवड व्हावी. रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा यासाठीप्रयत्न करावेत. यंदा जिल्ह्यात फळबाग लागवडीचे क्षेत्र दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करावेत.

ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडोसारख्या पीक उत्पादकांची बैठक घेऊन मार्गदर्शन करावे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून आगामी १५ दिवसांत जिल्ह्यातील शेतरस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Market Rate : ११ महिन्यांनंतरही 'कापूस उत्पादकता अभियाना'ला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतिक्षा; केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणा कागदावरच

Rabi Crop Insurance: सोलापूर जिल्ह्यातील केवळ ४३ हजार जणांनी भरला पीकविमा

Leopard Attack: डहाणूत बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू

Chikoo Farmers Issue: पालघरमधील चिकूच्या उत्पन्नाला कात्री

Flood Relief: जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून मदत

SCROLL FOR NEXT