Seed Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Storage : बियाण्याची साठवणूक करताना या बाबी लक्षात घ्या

बियाण्याची योग्य प्रकारे साठवण करण्याचा मुख्य उद्देश बियाण्याची अंकुर क्षमता व जोम यात होणारी घट कमी करणे व किडींचा प्रादुर्भाव कमी करने हा आहे. उबदार व दमट हवामानात सर्वच किटकांची वाढ झपाट्याने होते.

Team Agrowon

बियाणे साठवणुकीत (Seed Storage) किडींचे व्यवस्थापन, साठवणुकी दरम्यान असणारे तापमान व आर्द्रता यावर अवलंबून असते. बियाणे साठवणुकीत किडींचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. बियाण्याचे किडींपासून संरक्षण न केल्यास बियाणे खराब गुणवत्ता व दर्जाहीन होऊन उत्पादनात घट येते. या सर्व बाबींचा विचार केल्यास बियाणे साठविण्यासाठी आवश्यक त्या साधनांचा वापर करुन साठवणुकीत किडींचे प्रभावीपणे नियंत्रण केल्यास धान्याची साठवण चांगल्या प्रकारे करता येते.  बियांतील ओलाव्याचे किंवा वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण, साठवण काळातील वायु, बियाण्याची भौतिक स्थिती, अनुवंशिकता, जिवाणू, किडी इत्यादी घटकांचा बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होत असतो.  यापैकी बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण, बीज भांडारातील तापमान व वातावरणातील आर्द्रता इ. घटक महत्वाचे आहेत. बियाण्याची योग्य प्रकारे साठवण करण्याचा मुख्य उद्देश बियाण्याची अंकुर क्षमता व जोम यात होणारी घट कमी करणे व किडींचा प्रादुर्भाव कमी करने हा आहे. उबदार व दमट हवामानात सर्वच किटकांची वाढ झपाट्याने होते. साधारण ३० अंश सेल्सिअस उष्ण तापमान व ० ते ६५ टक्केहून जास्त आर्द्रता किटकांसाठी पोषक असते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आर्द्रता आणि तापमानाचा बियाण्यावर काय परिणाम होतो याबद्दल दिलेली माहिती पाहुया. 

आर्द्रता आणि तापमानाचा बियाण्यावर काय परिणाम होतो

बियाण्यातील ओलाव्याच्या प्रमाणात होणाऱ्या प्रत्येक १ टक्का वाढीमुळे बियाण्याचे आयुष्य निम्म्याने कमी होते. किंवा बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १ टक्क्याने कमी केल्यास बियाण्याचे आयुष्य दुपटीने वाढते. बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण अंदाजे ५ ते १४ टक्के दरम्यान असल्यास हा नियम लागू होतो. 

बियाणे साठवणुकीच्या तापमानात होणाऱ्या प्रत्येक पाच अंश सेल्सियस वाढीमुळे बियाण्याचे आयुष्य निम्म्याने कमी होते किंवा साठवणुकीचे तापमान पाच अंश सेल्सिअसने कमी केल्यास बियाण्याचे आयुष्य दुपटीने वाढते हा नियम सुद्धा साठवणुकीतील तापमान ० ते ५ अंश सेल्सियस दरम्यान असेल तेव्हाच लागू होतो.

आर्द्रतेमुळे बियाण्यात उष्णता वाढते व कुबट वास येऊ लागतो. बियाण्याच्या चवीत फरक पडतो त्यास कडवटपणा येतो आणि त्यावर बुरशी वाढते. असे बियाणे खाण्यासही योग्य राहत नाही. कोठारामध्ये जमिनीतून अगर खिडकीतून तसेच भिंतीतून ओल आल्यास बियाणे खराब होण्याची शक्यता असते. 

वातावरणात आर्द्रता जास्त असल्यास साठवलेल्या बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाणही वाढते. आर्द्रतेचे प्रमाण  ० ते २५ टक्के दरम्यान असल्यास, बियाण्यातील ओलावा अधिक जलद प्रमाणात वाढतो. २५  ते ७० टक्के दरम्यान मध्यम गतीने तर ७० ते १०० टक्के दरम्यान पुन्हा जलद गतीने वाढतो. 

सर्वसाधारणपणे बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्के पेक्षा जास्त वाढल्यास ते बियाण्याच्या अंकुरण क्षमतेला हानीकारक असते. 

बियाण्याची चांगल्या प्रकारे व अधिक काळापर्यंत साठवणूक करण्यासाठी थंड वातावरण अधिक उपयुक्त असते. १५ अंश सेल्सिअसच्या खाली  आणि ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान किडींसाठी हानीकारक असते.  साधारणपने तापमानात जसजशी वाढ होत जाते तसतसे बियाण्याच्या आयुष्यमानात घट होत जाते.

बियाण्याची साठवणूक प्राणवायु विरहित जागेत सुरक्षित करता येते. नत्र वायु हा इतर कुठल्याही वायू पेक्षा बियाण्यांचे साठवणुकीतील आयुष्यमान वाढविण्यास उपयुक्त ठरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT