Washim News : हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी अभियानाअंतर्गत राज्यात एक कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाशीम जिल्हा परिषदेच्या वतीने जनजागृती सुरू करण्यात आली आहे. .या मोहिमेअंतर्गत वाशीम जिल्ह्याला दोन लाख ७९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पंचायत समितीनिहाय मिळालेले आहे. वृक्ष लागवड करताना परिसराच्या भौगोलिक परिस्थितीनुसार स्थानिक प्रजातींची निवड करावी लागणार आहे. .Tree Plantation : धाराशिवकर रचणार आज वृक्ष लागवडीचा इतिहास.जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती व इतर शासकीय जागांवर लागवड करून शाश्वत हरितावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक वृक्षलागवडीची स्थळ नोंदणी, जिओ-टॅगिंग, छायाचित्रे व वृक्षांचे जिवंत राहण्याचे प्रमाण महिन्याला आणि सहामाही वन विभागाच्या पोर्टलवर अपलोड करणे यंदा अनिवार्य करण्यात आले आहे. .Tree Plantation: वृक्ष लागवडीने होणार जमिनीची हद्द निश्चिती.प्रत्येक व्यक्तीने आपल्या गावासाठी व आपल्या पृथ्वीसाठी किमान एक तरी झाड लावून या मोहिमेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण आणि पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी केले आहे..पंचायत समितीनिहाय उद्दिष्टपंचायत समिती ग्राम पंचायती वृक्ष लागवडीचे उद्दिष्टकारंजा ९१ ४५,५००वाशीम ८४ ४२,०००मालेगाव ८३ ४१,५००रिसोड ८० ३८,५००मानोरा ७७ ३८,०००मंगरूळपीर ७६ २४,५५००एकूण ४९१ २,७९,०००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.