Anil Kavde Agrowon
ॲग्रो विशेष

Anil Kavde : साखर आयुक्तपदाची सूत्रे कवडे यांनी स्वीकारली

Sugar Commissioner : राज्याच्या साखर आयुक्तपदाची सूत्रे अनिल कवडे यांनी बुधवारी (ता. ७) स्वीकारली. त्यांनी लगेच बैठक बोलावून आयुक्तालयाशी संबंधित साखर उद्योगातील घडामोडींचा बारकाईने आढावा घेतला.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या साखर आयुक्तपदाची सूत्रे अनिल कवडे यांनी बुधवारी (ता. ७) स्वीकारली. त्यांनी लगेच बैठक बोलावून आयुक्तालयाशी संबंधित साखर उद्योगातील घडामोडींचा बारकाईने आढावा घेतला.

पहिल्याच दिवशी चार तासांची मॅरेथॉन बैठक घेत नव्या आयुक्तांनी आपल्या कामकाजाची चुणूक दाखवून दिली. या बैठकीत त्यांनी साखर संचालक यशवंत गिरी (अर्थ विभाग) व प्रभारी संचालक राजेश सुरवसे (प्रशासन) यांच्याकडून महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेतल्या.

सहसंचालक मंगेश तिटकारे (प्रशासन), सहायक संचालक सचिन बऱ्हाटे यांनीही विविध विषयांची माहिती दिली. सहकार व महसूल विभागातील दांडगा अनुभव श्री. कवडे यांना आहे. त्यांनी यापूर्वी साखर आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभारदेखील हाताळलेला आहे.

त्यामुळे आयुक्तालयाशी संबंधित धोरणात्मक घडामोडी, समस्यांचे बारकावे त्यांच्या लगेच लक्षात येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सहकार आयुक्तपदी राव रुजू : राज्याच्या सहकार आयुक्तपदाची सूत्रे सौरभ राव यांनी बुधवारी अनिल कवडे यांच्याकडून स्वीकारली. पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून श्री. राव गेल्या तीन वर्षांपासून काम पहात होतो. त्यांचे स्वागत अपर निबंधक (प्रशासन विभाग) शैलेश कोतमिरे व श्रीकृष्ण वाडेकर (पतसंस्था विभाग) यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी शक्य

Agrowon Podcast: गहू-करडईची आवक घटली, आल्याचे दर स्थिर; पपई-फ्लॉवर दर टिकून व तेजीत

Leopard Terror : खानदेशात पर्वतीय भागात बिबट्यांची दहशत

Banana Research Center : सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र सुरू करावे

SCROLL FOR NEXT