Sustainable Agriculture : नांदेडमध्ये २०० शेतकरी गटांची स्थापना होणार

Agricultural Development Scheme : राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजनाच्या धर्तीवर करण्यात येत आहे. या योजनेत नांदेड जिल्ह्यामध्ये २०० गट स्थापन करण्यात येणार आहेत.
Sustainable Agriculture
Sustainable AgricultureAgrowon
Published on
Updated on

Nanded News : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजनाच्या धर्तीवर करण्यात येत आहे. या योजनेत नांदेड जिल्ह्यामध्ये २०० गट स्थापन करण्यात येणार आहेत.

नांदेडमध्ये आजपर्यंत १३० गटांची स्थापना करण्यात आली आहे. प्रती गट ५० एकर क्षेत्र याप्रमाणे नैसर्गिक शेतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

Sustainable Agriculture
Sustainable Agriculture : शाश्‍वत शेतीसाठी केव्हीकेमार्फत कृषी हवामान व निसर्ग शेतीचा जागर

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीची अंमलबजावणी गटामार्फत होणार आहे. ५० एकर क्षेत्रांचा एक गट यात किमान २० शेतकरी तसेच प्रति शेतकरी क्षेत्र मर्यादा २ हेक्टरपर्यंत राहणार आहे. या गटांची नोंदणी आत्माअंतर्गत करण्यात येणार आहे.

Sustainable Agriculture
Sustainable Agriculture : शाश्वत कृषीरथाचे चार अश्व

तसेच प्रत्येक गटासाठी गट प्रवर्तक व साहाय्यक गट प्रवर्तक अशा दोन व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. गट प्रवर्तकाला तीन हजार प्रति महिना मानधन तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहे. तसेच ४ ते ५ उत्पादक गट मिळून एक समूह संघटन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण पीजीएस इंडिया आणि आयसीएस पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सेवा प्रदाता व सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणेची नियुक्ती करण्यात येणार आहे. ५० एकरच्या एका गटासाठी सेंद्रिय शेतीची अंमलबजावणी करण्यासाठी एकूण २० लाख प्रती गट या प्रमाणे अर्थसाहाय्य तीन वर्षांत पुढील प्रमाणे देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात २०० शेतकरी गट स्थापन करण्यात येणार आहेत. आजपर्यंत १३० गटाची स्थापना करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

तालुकानिहाय गट लक्षांक (कंसात गट स्थापना)

नांदेड-२० (४), अर्धापूर-१० (१०), मुदखेड-१० (५), लोहा-१० (५), कंधार-१० (६), देगलूर-२० (१२), मुखेड-१० (४), नायगाव-१० (२), बिलोली-१० (५), धर्माबाद-१० (४), किनवट-१० (८), माहूर-१० (७), हदगाव-२० (२०), हिमायतनगर-१० (१०), भोकर-२० (२०), उमरी-१० (८).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com