Karnataka Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Karnataka Sugar Factories : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने सुरू; कोल्हापूर विभागातील उसाची होणार पळवापळवी

Belgaum District Sugarcane : बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होणार असल्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या पट्ट्यातील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Karnataka Border Sugar Factories : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांबाबत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऊसगळीत हंगाम शुक्रवार (ता.०८) सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. यामुळे कारखानदार व ऊस उत्पादकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होणार असल्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या पट्ट्यातील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.

उत्तर कर्नाटकातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याबाबतचा आदेश आधी शासनाने काढला होता; पण त्या आदेशात बदल केला आहे. आता एक आठवडा आधीच गळीत हंगाम सुरू होईल; पण गळीत हंगाम सुरू झाला तरी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे ऊसतोडणी कामगार उत्तर कर्नाटकात दाखल होण्यास विलंब होऊ शकतो. त्याचा फटका काही साखर कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे. या कामगारांच्या समस्येमुळे काही कारखान्यांचे गाळप सुरू होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

दक्षिण व उत्तर कर्नाटकातील ऊस शेती, उत्पादन पद्धत, हवामान यात फरक असल्याने एकाचवेळी राज्यभरातील गळीत हंगाम सुरू होत नाही. दक्षिण व उत्तर कर्नाटकातील गळीत हंगामासाठी वेगवेगळी तारीख शासनाकडून निश्‍चित केली जाते. यंदाही सात ऑगस्ट रोजी झालेली बैठक व १३ ऑगस्ट रोजी साखर आयुक्तांनी दिलेल्या पत्राच्या आधारे उत्तर कर्नाटकातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

‘लवकर कारखाने सुरू करा’

रयत संघटना तसेच अन्य शेतकरी संघटनांकडून साखर आयुक्तांची भेट घेण्यात आली होती. गळीत हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे साखर आयुक्तांनी हंगाम लवकर सुरू करण्याबाबतचे पत्र शासनाला पाठविले होते. हंगाम विलंबाने सुरू झाल्यास कोणत्या समस्या उद्‍भवू शकतात, याची माहितीही दिली होती. त्यामुळेच १३ सप्टेंबरचा आदेशात दुरुस्ती करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे.

प्रतिटन ३,४०० रुपये दर प्रस्तावित : मंत्री पाटील

राज्यात ८० साखर कारखाने कार्यरत असून, सुमारे ७.५ लाख हेक्टर क्षेत्रात उसाचे पीक घेतले जाते. यावेळी उसासाठी प्रतिटन ३,४०० रुपये प्रस्तावित आहे, असे साखर उद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT