River Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

River Pollution : माणगावची काळ नदी प्रदूषणाच्या विळख्यात

Kal River Pollution : माणगाव शहरातून बाराही महिने वाहणारी आणि तालुक्यातील वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या काळ नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे.

Team Agrowon

Raigad News : माणगाव शहरातून बाराही महिने वाहणारी आणि तालुक्यातील वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या काळ नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. या नदीच्या पात्रात कचरा टाकला जात असून, सांडपाणीदेखील सोडण्यात येत आहे, तसेच मातीचा भराव टाकल्यामुळे पाण्यावर लालसर तवंग आलेला आहे.

त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगर पंचायत कार्यालयामध्ये विचारणा केली असता, शहराला जल शुद्धीकरण केंद्रामार्फत स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. कोणत्याही इमारतीचे सांडपाणी नदीत सोडण्यात आलेले नाही. काळ नदी प्रदूषित करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांत नदीकिनारी बेकायदा इमारती, बंगले आणि घरे बांधण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नदी किनाऱ्यापासून १०० मीटर अंतरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. तरीही किनाऱ्यालगत बेकायदा बांधकामे सुरूच आहेत.

त्यामुळे कचरा आणि मोठ-मोठ्या इमारतीचे सांडपाणी काळ नदीपात्रात बिनदिक्कत सोडण्यात येत आहे, तसेच शौचालयाच्‍या मलमूत्राचीदेखील त्‍यात भर पडत आहे. त्‍यामुळे काळ नदी दूषित झाली आहे.

१९९५ मध्ये दूषित पाण्यामुळे माणगाव शहरात काविळीची साथ येऊन त्यात तीन जण दगावले होते. हा दूषित पाणीपुरवठा माणगाव शहरातील भादाव, उतेखोल, खांदाड, जूने माणगाव आणि नदीकाठावरील गोरेगावसह सुमारे ५० गावांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांच्‍या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

माणगाव नगर पंचायतीमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी जल शुद्धीकरण केंद्र सुरू असल्याने किमान शुद्ध पाणी मिळत आहे, मात्र नदीकिनारी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जल शुद्धीकरण केंद्र अस्तित्वातच नसल्याने तेथे नदीचे दूषित पाणी थेट गावात आणि घरात जात आहे. त्यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना नाहक बळी पडावे लागत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT