Onion Export Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export : कांदा निर्यातीत गुजरातला न्याय; महाराष्ट्रावर अन्याय

Onion Market : महाराष्ट्रात विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होत असतानाही येथून कांदा निर्यात करता येणार नाही. त्यामुळे गुजरातच्या कांदा उत्पादकांना न्याय तर महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांवर अन्याय, अशी टीका होऊ लागली आहे.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारने गुजरातमधील २ हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीची अधिसूचना काढली. त्यानुसार गुजरातच्या फलोत्पादन आयुक्तांनी निर्यात करावयाची वस्तू आणि प्रमाण हे प्रमाणित केल्यानंतरच पांढऱ्या कांद्याची निर्यात होणार आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रात विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होत असतानाही येथून कांदा निर्यात करता येणार नाही. त्यामुळे गुजरातच्या कांदा उत्पादकांना न्याय तर महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांवर अन्याय, अशी टीका होऊ लागली आहे.

केंद्र सरकारने ग्राहक हिताचा विचार करून ८ डिसेंबरपासून ऐन लेट खरीप कांदा हंगामात निर्यातबंदीचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे ३ हजार ५०० कोटींवर नुकसान झाले. त्यामुळे कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र केंद्र सरकारने याचा कधीही विचार केलेला नाही.

यापूर्वी ६४ हजार टन कांद्याची निर्यात गुजरातमधील राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित या संस्थेमार्फत करण्याची अधिसूचना आली. त्यामध्ये ग्राहक व्यवहार विभागाचा हस्तक्षेप सातत्याने दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा नाहीच, मात्र निर्यातदार अडचणीत सापडले.

राज्यात प्रामुख्याने नाशिक, नगर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धुळे, धाराशिव व सातारा या प्रमुख जिल्ह्यांसह राज्यातील एकूण २२ जिल्ह्यांतून कमी अधिक प्रमाणावर लाल, गुलाबी व पांढऱ्या कांद्याची आवक होते. मात्र ग्राहक हिताचा वारंवार विचार केंद्र सरकारने कांदा उत्पादकांवर अन्याय केला, तर गुजरातमधील शेतकरी व कंपन्यांचे भले केले जात असल्याचा संतापाचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे.

केंद्र सरकारने फक्त गुजरातचा २ हजार टन पांढऱ्या कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. हा निर्णय राज्या-राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करणारा आहे. यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संताप आहे. सरकारने त्वरित पूर्णपणे निर्यात खुली करावी, अन्यथा शेतकरी मतपेटीतून या निर्यातबंदीचे उत्तर देतील.
भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT