Onion Market : नव्या उन्हाळ कांद्याची आवक सुरू

Summer Onion : पर्जन्यमान कमी असल्याने कसमादे भागातील काही शेतकऱ्यांनी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आगाप उन्हाळ कांदा लागवडी केल्या होत्या.
Onion Market
Onion Market Agrowon
Published on
Updated on

Nashik News : पर्जन्यमान कमी असल्याने कसमादे भागातील काही शेतकऱ्यांनी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आगाप उन्हाळ कांदा लागवडी केल्या होत्या. त्याची काढणी सुरू होऊन नव्या रब्बी उन्हाळ कांद्याची सटाणा बाजार समितीमध्ये आवक सुरू झाली आहे. त्यास क्विंटलला सरासरी ११८० रुपये दर मिळाला आहे. खरीप कांद्याच्या तुलनेत क्विंटलमागे १५० रुपये अधिक दर मिळाल्याचे दिसून आले.

सटाणा येथील शेतकरी भूषण केदा सोनवणे यांनी ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या सप्ताहात ४ एकर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची आगाप लागवड केली होती. त्यांचा कांदा ११५ दिवसानंतर काढणीला आला. त्याची विक्री सटाणा बाजार समितीमध्ये केली. खरिपाच्या तुलनेत १५० रुपये अधिक दर त्यास मिळत आहे.

Onion Market
Onion Market : कांद्याच्या आढाव्यासाठी पुन्हा केंद्राचे पथक राज्य दौऱ्यावर

सोनवणे यांच्याकडून सोमवारी (ता.१२) पहिल्या दिवशी दोन खेपेत अनुक्रमे ३५ व ३१ अशी एकूण ६८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ११८१ रुपये दर मिळाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१३) तीन खेपेत अनुक्रमे ३५,२५ व २५ क्विंटल अशी एकूण ८५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ११८० रुपये दर मिळाला.

Onion Market
Onion Market : शासकीय कांदा खरेदी उरली केवळ नावापुरती

काढणीस आलेल्या कांद्याचा रंग नेहमीप्रमाणे मध्यम फिकट व आकार ४० ते ५० मिमी व गोल्टी असा मिळाला आहे. मात्र हवामान प्रतिकूल असल्याने एकरी ११० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे उत्पादनात ३० टक्के घट आहे.

मागील वर्षी उन्हाळ कांदा साठवला. मात्र दरवाढीची अपेक्षा होती. त्यामुळे तो घेऊनही चाळीत साठवला. मात्र दराची वाट पाहून तो चाळीतच सडला. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी यंदा आगाप लागवड केल्यानंतर काढणीपश्चात लगेच विकला. खरीप कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला अधिक दर आहे. मात्र निर्यातबंदीमुळे क्विंटलमागे १५०० ते २,००० रुपयांचा फटका आहे.
- भूषण सोनवणे, कांदा उत्पादक
चालु वर्षी २ ते ३ आठवडे उन्हाळ कांदा बाजारात आला. मात्र तुलनेत दर कमी आहेत. मार्चमध्ये आवक वाढेल.
- भास्कर तांबे, सचिव, बाजार समिती, सटाणा, जि. नाशिक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com