White Onion Export : दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीची अधिसूचना जारी

Onion Market : लेट खरीप कांद्याचा हंगाम वेगात असताना ८ डिसेंबरपासून केंद्र सरकारने केलेल्या निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
White Onion
White Onion Agrowon
Published on
Updated on

Nashik News : लेट खरीप कांद्याचा हंगाम वेगात असताना ८ डिसेंबरपासून केंद्र सरकारने केलेल्या निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. असे असताना त्यानंतर ६४ हजार टन कांदा निर्यातीची परवानगी राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित या संस्थेला देण्यात आली.

तर आता पुन्हा गुजरात राज्यातीलच पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देत अधिसूचना वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली. त्यानुसार २ हजार टन पांढऱ्या कांद्याची निर्यात होईल.

White Onion
White Onion Rate : पांढरा कांदा खातोय भाव

विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार २ टन कांद्याची निर्यात केली जाईल. हे कामकाज तत्काळ प्रभावाने करण्याच्या यात सूचना आहेत.

त्यासाठी गुजरात राज्यातील मुंद्रा, पिपावाव व नाव्हाशेवा म्हणजेच जेएनपीटी बंदरातून ही निर्यात करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये निर्यातदाराला गुजरात सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

White Onion
White Onion Arrival : चांबळ्याचा पांढरा कांदा बाजारात

पांढरा कांदा निर्यातीचा घाट का?

गत लेट खरीप हंगाम हंगामातील लाल कांद्याच्या विक्रीला गती येत असतानाच केंद्र सरकारने निर्यातबंदी करून शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे हजारो कोटींचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे.

त्यातच आता रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरू होऊन कांदा बाजारात येत आहे. असे असताना एकीकडे कांदा कवडीमोल दराने विक्री होत आहे. तर पांढऱ्या कांद्याला अधिक दर असतानाही त्याच्या निर्यातीस परवानगी दिली, मात्र लाल व गुलाबी कांद्याला का नाही, असा सवाल निर्यातदारांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com