Buldhana News: मागील काही वर्षांत शेतीचा उत्पादन खर्च वारेमाप वाढला असून त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढलेले नाहीत. यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ जुळता जुळेना, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. .सोयाबीन व कापूस हे नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. सोबतच येथील शेतकरी तूर, मका, उडीद, मूग, ज्वारी आदींसारखे पीक कमी-अधिक प्रमाणात घेत असले तरी उत्पादन खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न, यांच्यासोबतच सध्या मिळत असलेला बाजारभाव यांचा कोणताच ताळमेळ बसत नसल्याने शेती हा घाट्याचा व्यवसाय ठरत आहे..Land Survey: शेतकऱ्यांच्या जमीन मोजणी खर्चात बचत होणार; भूमि अभिलेख विभागाचा निर्णय.मार्च २०२२ मध्ये कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटल पार असलेला बाजारभाव आज ७ हजार प्रति क्विंटलवर येऊन ठेपला आहे. तीच परिस्थिती इतर सर्व शेतमालाची आहे. दुसरीकडे खते, बियाणे व कीटकनाशकांचे दर दुपटीवर गेलेले आहेत. मजुरीचे दरही गगनाला भिडले असल्याने उत्पादन खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याने बळीराजा कर्जाच्या विळख्यात सापडला आहे..Farmers Protest: शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे वीस दिवसानंतर बाभळीचे दरवाजे बंद.अशा स्थितीत भावांतर योजनेतून शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. यावर्षी अतिवृष्टीसदृश पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले असून, पीक घरात येण्याच्या अवस्थेतही पाऊस सुरू राहिल्याने पिकांचा दर्जा घसरला आहे. सध्या मक्याला खासगी बाजारपेठेत केवळ १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल, तर कापसाला सात हजार प्रति क्विंटल भाव मिळत आहेत. हे भाव खर्चाच्या मानाने परवडणारे नसल्याने शासनाने सर्व पिकांसाठी भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपातून मदत देऊन त्यांचे अश्रू पुसावेत, अशी मागणी जोर धरत आहे..यावर्षी सर्वच पिकांचे उत्पादन हे नैसर्गिक संकटामुळे कमी झाले आहे. महागाईच्या काळात उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतीव्यवसाय तोट्यात आला आहे. शासनाचे उदासीन धोरण यासाठी कारणीभूत असल्याने शासनाने आता तरी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून हा व्यवसाय टिकावा, याकरिता भावांतर योजनेतून मदत जाहीर करावी.- शेखर जाधव, शेतकरी, टाकरखेड, जि. बुलडाणा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.