कांद्याचा भाव १ रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी चक्क कांद्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलीसरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न .Onion Prices Crash: कांद्याचा भाव १ रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर हताश झालेल्या मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्क कांद्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. ही घटना मंदसौर जिल्ह्यातील धमनार गावात घडली..कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन आणि वाहतूक खर्चही भरून निघालेला नाही. यावरुन नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक कांद्याची अंत्ययात्रा काढून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. .Pakistan Onion Production: पाकिस्तानच्या कांदा उत्पादनवाढीचे भारतीय कांद्यासमोर आव्हान.धामनर गावातील शेतकरी स्थानिक स्मशानभूमीकडे फुलांनी सजवलेली तिरडी, ढोल आणि बँडबाजासह घेऊन गेले. यातून त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह कसा धोक्यात आहे? त्यांची परिस्थिती किती बिकट आहे? असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. .Onion Price Protest: कांदा दरातील घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको.मालवा-निमार हा देशातील सर्वात मोठ्या कांदा उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे. येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कांदा पिकास बाजारात प्रतिकिलो केवळ १ ते १० रुपये भाव मिळत आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर प्रतिकिलो १ ते २ रुपये इतकी कमी भाव मिळाला. कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो १० ते १२ रुपये एवढा आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.."आमच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही," असे कांदा उत्पादक शेतकरी बद्रीलाल धाकड सांगतात. ते पुढे म्हणाले की या पिकाचा उत्पादन खर्च अधिक आहे. त्या तुलनेत भाव मिळत नाही. जर सरकारला शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात येत नसेल. ते जागे नसेल तर आम्ही काय करू शकतो? जर आमचा उत्पादन खर्च भरून निघाला नाही तर आम्ही कुठे जाणार?, अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली..दुसऱ्या एका शेतकऱ्याने त्याची भावना व्यक्त करताना म्हटले, "कांदा पीक हे आम्हाला आमच्या मुलांसारखे आहे. ते एक आमच्या कुटुंबाचा भाग आहे. अतिवृष्टीमुळे दुसरे पीकदेखील नष्ट झाले. आता हा कांदादेखील वाया गेला. म्हणून आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. सरकार आमचा खर्च भरून निघेल इतके पुरेसे पैसे देत नाही." .त्यांच्या संतापाचे मूळ कारण म्हणजे कांद्यावर लागू केलेले २५ टक्के निर्यात शुल्क आहे. यामुळे भारतीय कांदा जागतिक बाजारात स्पर्धा करु शकलेला नाही. निर्यात कमी झाली असून देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. परिणामी, बाजार समित्यांमध्ये भाव कोसळले आहेत..शेतकऱ्यांनी तहसीलदार रोहित सिंह राजपूत यांना याबाबत निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले, "कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ हवी आहे. सरकारने किमान आधारभूत किमतीत कांदा खरेदी करावी. याबाबत त्यांनी निवेदन सादर केले आहे. याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल आणि त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवले जाईल.".ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.