Crop In Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Crop In Crisis : पावसाच्या उघडिपीमुळे पिकांनी टाकल्या माना

Monsoon Rain : मे-जूनमध्ये जोरदार पाऊस झाला. पिके ऐन भरात असताना जुलै-ऑगस्टमध्ये मात्र पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Team Agrowon

Nashik News : मे-जूनमध्ये जोरदार पाऊस झाला. पिके ऐन भरात असताना जुलै-ऑगस्टमध्ये मात्र पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुक्यात गेल्या ३६ दिवसांत फक्त ८६ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे पिकाना पाणी टंचाईचा फटका बसत असून कडक ऊनही पडत असल्याने पिके माना टाकत आहेत. खरिपासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

यावर्षी प्रथमच जूनमध्ये खरीप पेरणीसाठी मृग नक्षत्राचा पाऊस वेळेत कोसळला. त्यामुळे वेळेत पेरणी होऊन पिकेदेखील जोमात आली होती. पूर्ण महिनाभर पावसाची दमदार हजेरी लागत असल्याने जलस्रोतांना पाणी उतरले होते.

त्याचवेळी महिनाभराहून अधिक वेळ ढगाळ हवामान असल्याने शेतकऱ्यांना फवारणी करून पिके जोमात आणली खरी पण जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिली आहे. मुळात पिके महिनाभराची होऊन गेली असून वाढीचा काळ असताना पिकांना टंचाईचा फटका बसट आहे.

तालुक्यात सुमारे ४४ हजार हेक्टरवर मक्याचे पीक घेतले असून सर्वत्र मका पीक तीन ते पाच चार फुटांच्या उंचीपर्यंत वाढले आहे. मूग, सोयाबीनचे पीकही जोमात असताना महिनाभरात एक ते दोन वेळेसच हलका पाऊस पडला आहे, यामुळे पिकांना आधार मिळाला असला तरी गेल्या चार ते पाच दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत आहे.

जमिनीतील पाण्याची ओली खाली गेल्याने आता पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असून पावसाच्या उघडिपीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जुलैमध्ये केवळ ८४ मिमी पाऊस पडला. तर ऑगस्टच्या सुरुवातीला पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने खरिपाचे चित्र बिकट व्हायला सुरुवात झाली.

तालुक्यात अंगणगाव व राजापूर महसूल मंडलांत सर्वांत कमी पाऊस आहे, विशेषतः पश्चिम पट्ट्यातील देशमाने, जळगाव नेऊर भागात नद्या अद्याप तुडुंब भरून पाणी वाहताना दिसते. मात्र उत्तर-पूर्व भागातील अवर्षणप्रवण गावांतील नदी, नाले, बंधारे कोरडेच आहेत. विहिरींना पाणी आले होते मात्र शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरू केल्याने त्याचाही उपसा होत आहे.

पालखेडच्या पाण्याचा आधार

पालखेड डाव्या कालव्याला ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले. या पाण्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. पाण्यामुळे जमिनीतील पातळी वाढत असून आजूबाजूचे बंधारे नदी-नाल्यांनाही पाणी सोडल्याने पिकांना पाणी देणे सोपे झाले आहे.

Rain Update
Rain Update

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Eknath Shinde: दरडीप्रवण भागातील कुटुंबांचे पुनर्वसन करणार : एकनाथ शिंदे

Sugarcane Workers Welfare: ऊसतोड मजुरांच्या आरोग्य समस्येवर ‘साथी’चा इलाज

National Jowar Varieties: रब्बी ज्वारीचे दोन सुधारित वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित

Fruit Orchard Cultivation: फळबाग लागवडीला बारामती उपविभागात गती

SCROLL FOR NEXT