Crop In Crisis : पावसाने आठवडाभर दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

Monsoon Rain : भातलावणी केल्याच्या काही दिवसांपासून पाऊसच पडत नसल्याने शेतजमीन पूर्णतः सुकून तडकू लागल्याने भातरोपे कोमेजून गेली आहेत.
Crop In Crisis
Crop In Crisis Agrowon
Published on
Updated on

Palghar News : वाडा तालुक्यात मागील आठवडाभरापासून पावसाने दांडी मारली असून, लावणीची शेतजमीन कोरडी पडली आहेत. शेतजमिनीला पावसाअभावी सुकून भेगा पडून रोपाची मुळे तुटण्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

भातलावणी केल्याच्या काही दिवसांपासून पाऊसच पडत नसल्याने शेतजमीन पूर्णतः सुकून तडकू लागल्याने भातरोपे कोमेजून गेली आहेत. याचा विपरीत परिणाम भातपिकावर होण्याची शक्यता असून, पाऊस काही दिवसांनी पडला नाही, तर शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Crop In Crisis
Crop In Crisis : असमतोल पावसाचे संकट

वाडा तालुक्यात सध्या गरवी भातशेतीच्या तुलनेत हळवार भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यात मोठे क्षेत्र वनपट्ट्यात येत असून, रानमाळासह डोंगर-दऱ्यातही मोठ्या प्रमाणावर हळवार भातपिकाची लागवड केली जाते.

हळवार शेतजमीन ही नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर भातशेतीचे मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पावसाअभावी इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिली, तर भातशेतीला फटका बसेल, अशी भीती शेतकरी प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केली.

Crop In Crisis
Fertilizer Shortage : युरिया, डीएपीचा तुटवडा, लिंकिंगने शेतकरी त्रस्त

उरण तालुक्यामध्ये खतांचा तुटवडा

उरण तालुक्यात भातलावणीची कामे आता संपली असून, खुरपणीला सुरुवात झाली आहे. या पिकांना खतांची आवश्यकता आहे, मात्र तालुक्यात सध्या खतांचा तुटवडा जाणवत आहे. तालुक्यात आणि पनवेलमध्येही खत न मिळल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याची दखल कृषी विभागाने घेऊन खते उपलब्ध करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

यंदा पावसामुळे या भागातील लावणीला काहीसा उशीर झाला. शेतकऱ्यांनी आपली शेती ओसाड पडू नये या करिता प्रयत्न करत शेतात रोपे लावली आहे, मात्र या रोपांची वाढ होण्यासाठी खतांची गरज आहे, परंतु तालुक्यात खतांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शेती ही धोक्यात आल्याचे दिसून आले, याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

खते उपलब्ध करणार

शेतीला वर्षभरासाठी साधारण ४०० टन एवढ्या खताची गरज असते. उरण आणि पनवेलमध्ये कुठेही खत उपलब्ध नाही. कृषी विभागाने आरसीएफकडे मागणी केली आहे, मात्र अद्याप पुरवठा केला नाही. याबाबत पाठपुरावा केला जात असून, लवकर खते उपलब्ध करून दिली जातील, असे कृषी अधिकारी अर्चना सूळ यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com