Fruit Juice Business Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Juice Business : फळबागेला दिली ज्यूस व्यवसायाची जोड

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : १७ जणांचे एकत्रित कुटुंब, शिवारात फळपिकांची लागवड आणि उत्पादित फळांची विक्री न करता त्यावर प्रक्रिया करीत ज्यूसची विक्री व त्यातून अवघ्या सहा महिन्यांतच लाखोंची उलाढाल अशा फायदेशीर शेतीचा पॅटर्न जवळा येथील खान कुटुंबीयांनी राबविला आहे.

जवळा येथील नजीर खान हे आठवडी बाजारात चहाची विक्री करीत होते. याच व्यवसायात सातत्य राखत त्यांनी आर्थिक संपन्नता गाठली. आज नागपूर-नांदेड महामार्गावर या कुटुंबीयांची बारा एकर शेती आहे. या कुटुंबात अयुब खान, फिरोज खान तसेच अहमद खान हे तिघे भाऊ व दोन बहिणी याप्रमाणे पाच जणांचा समावेश आहे.

दोन्ही बहिणींचे लग्न झालेले आहे. मात्र त्यानंतरही एकत्रित कुटुंब पद्धतीचा आदर्श सांगणाऱ्या या परिवारात १७ सदस्य आहेत. कुटुंबाच्या शेतीचे सामूहिक पद्धतीने व्यवस्थापन ते करतात. १२ एकर शेतीचे विभाजन केले असता त्यामध्ये १२०० झाडे डाळिंबाची आहेत. ३५० संत्रा, ६० रामफळ, २०० मोसंबी, ६०० पेरू याप्रमाणे लागवड केलेली आहे.

शेती महामार्गालगत असल्याने या संधीचा फायदा घेत या कुटुंबीयांनी शेतीच्या समोरील भागात फळांपासून ज्यूस तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. गेल्या १० वर्षांपासून यात सातत्य राखण्यात आले आहे. फळांची बहुतांशी व्यापाऱ्यांना विक्री होते, असे अयुब खान यांनी सांगितले. ज्यूससाठी लागणाऱ्या फळांची खरेदी बाजारातून केली जाते. जानेवारी ते जून या काळात ज्यूसला मागणी अधिक राहते. या सहा महिन्यांतच आठ ते दहा लाख रुपयांची उलाढाल होते, असेही ते म्हणाले.

बागेतील फळांची व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. फळांची टिकवण क्षमता कमी राहते. हंगामात काही फळे ज्युससाठी बागेतून घेत त्याचा वापर होतो. उन्हाळ्यात जानेवारी ते जून हा हंगाम असतो. ज्यूसला या काळात मागणी राहते. या सहा महिन्यांतच आठ ते दहा लाख रुपये मिळतात. येत्या काळात २५० केसर आंब्याची झाडे लावण्याचे नियोजन आहे.
अहमद खान, शेतकरी, जवळा, आर्णी, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यात डझनभर साखर कारखानदार उतरणार विधानसभेच्या रिंगणात, गळीत हंगामावर परिणामाची शक्यता

Karnataka Sugarcane Frp : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांची एफआरपी ३९०० पार

Dragon Fruit Farming : दुष्काळात ड्रॅगन फ्रूटचा मिळाला आश्‍वासक पर्याय

Agriculture Success Story : शेतीसारखे समाधान कुठेच अनुभवले नाही...

Brain Psychology : मेंदूच्या भौतिकीचे मानसशास्त्र

SCROLL FOR NEXT