Rajashri Shahu Maharaj Agrowon
ॲग्रो विशेष

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti : छत्रपती शाहू जयंती राज्यभर उत्साहात

150th Birth Anniversary : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना एकशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त बुधवारी (ता. २६) जिल्हाभर मानवंदना देण्यात आली.

Team Agrowon

Kolhapur News : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना एकशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त बुधवारी (ता. २६) जिल्हाभर मानवंदना देण्यात आली. जिल्ह्याला समृद्धी देणाऱ्या शाहू महाराज यांच्या कार्याचे स्मरण करत विविध उपक्रमांनी लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम राबवत जयंती सोहळा झाला. विविध कार्यक्रमांसह शोभायात्रांनी दिवसभर वातावरण शाहूमय झाले.

शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. या वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे आदी उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोकाभिमुख कामासाठी त्यांना भारतरत्न मिळावा, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे. यासाठी आपण राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे मागणी करणार असल्याची माहिती श्री. मुश्रीफ यांनी येथे दिली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त (१५० वी जयंती वर्ष) जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य कुस्ती संकुलाचे उद्‌घाटन हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्या हस्ते झाले.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह हिंदकेसरी विनोद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे या वेळी प्रमुख उपस्थित होते. दसरा चौकातील पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

या जयंती महोत्सवाची सुरुवात जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वामी विवेकानंद कॉलेज येथे घेण्यात आलेल्या ‘शाहू विचार जागर’ कार्यक्रमाने करण्यात आली. शहराबरोबर जिल्ह्यातील विविध संस्था, शाळा यासह शासकीय आस्थापनांमध्येही शाहू महाराज यांना वंदन करण्यात आले. या वेळी व्याख्यान, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आदींसह सामाजिक उपक्रम घेण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT