Jowar  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Seed : ‘रब्बी’साठी सवलतीत मिळणार ज्वारीचे बियाणे

Rabi Season : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून यंदा रब्बी हंगामासाठी ज्वारीचे बियाणे सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Solapur News : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून यंदा रब्बी हंगामासाठी ज्वारीचे बियाणे सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे. प्रामुख्याने ज्वारीचे हे बियाणे १० वर्षाच्या आतील आणि १० वर्षावरील प्रमाणित बियाणे असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक ज्वारीची पेरणी होते. मुख्यतः ज्वारीमुळेच सोलापूरची ओळख आहे, दरवर्षी या हंगामात किमान ५ ते ६ लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी होते, त्यामुळे कृषी विभागानेही ज्वारीचे बियाणे पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी विभागाकडून त्यासाठी तयारी झाली असून, प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला किमान दोन हेक्टर मर्यादेत हे बियाणे मिळणार आहे. तालुकास्तरावरील महाबीजच्या अधिकृत वितरकाकडे हे बियाणे उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधून बियाणे परमीट उपलब्ध करुन घ्यावे, परमीट अधिकृत वितरकाकडे जमा करुन अनुदानाची रक्कम वजा जाता, उर्वरित रक्कम अदा केल्याची पावती घेऊन शेतकऱ्यांनी बियाणे घ्यावे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

ज्वारीच्या दहा वर्षाच्या आतील बियाणे वाणासाठी प्रतिकिलोला ३० रुपये, तर दहा वर्षाच्यावरील प्रमाणित बियाणासाठी प्रतिकिलो १५ रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी हे बियाणे घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT