Rabi Season 2024 : सांगली जिल्ह्यात रब्बी पेरण्या सुरू

Rabi Sowing : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र दमदार पावऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.
Kolhapur Rabi Season
Kolhapur Rabi Seasonagrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत शेतकऱ्यांनी ज्वारी आणि मका पिकांची पेरणी सुरू केली आहे. या दोन्ही पिकांचा ६२१ हेक्टरवर पेरा झाला आहे. येत्या पंधरा दिवसांत पेरणीला गती येईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात १ ते ३० सप्टेंबर या काळात सरासरी १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र दमदार पावऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. जत, कवठेमहांकाळ यासह अन्य तालुक्यांत रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी या पावसावर सुरू होते.

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यातील मूग, उडदाची काढणी जवळपास आटोपली आहे. त्यामुळे जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका आणि ज्वारी पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे. जत तालुक्यात ज्वारी ३४९, मका ९१ असे एकूण ४४० हेक्टरवर तर कवठेमहांकाळ तालुक्यात ६८ मका ११३ असे एकूण १८१ हेक्टरवर पेरणा झाला आहे.

Kolhapur Rabi Season
Rabi Season : रब्बी हंगामात ज्वारीवर भर

दरम्यान, जिल्ह्यातील इतर भागात भुईमूग, सोयाबीन यासह अन्य पिके काढणी आली आहेत. मात्र, पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांची काढणी लांबणीवर पडली असून सोयाबीनची २५ टक्के तर भुईमुगाची २० टक्के काढणी झाली आहे. त्यामुळे वाळवा, मिरज, कडेगाव, शिराळा, पलूस, तासगाव, खानापूर या तालुक्यात रब्बीचा पेरा लांबणीवर पडणार आहे. तर आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यात बाजरीची काढणी ९० टक्के आटोपली आहे.

Kolhapur Rabi Season
Rabi Season 2024 : बाजरी, कंदा लागवड घटणार; मका, तेलबिया पिकांकडे कल

बियाणे, खतांची केली मागणी

कृषी विभागाने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. कृषी विभागाने यंदाच्या रब्बीसाठी २ लाख ८० हजार ९७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यानुसार ज्वारी, गहू, हरभरा मका यासह अन्य पिकांचे २१ हजार ३१७ क्विंटल सार्वजनिक, खासगी कंपन्यांकडून बियाण्यांची मागणी केली आहे. तर रब्बी हंगामासाठी १ लाख ८० हजार ६१५ टन खतांची मागणी केली आहे. रब्बी हंगामात खते आणि बियाण्यांची कमतरता पडणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घेतली आहे.

रब्बी हंगामासाठी बियाणे मागणी दृष्टिक्षेप

पीक बियाणे मागणी क्विंटल

ज्वारी ३,६१९

गहू ७,७७०

मका ५,७२५

हरभरा ४,०७६

करडई ३६

सूर्यफूल ७५

कांदा १६

एकूण २१,३१७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com