Summer Water Shortage: विक्रमगड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यातच नदी, नाले आणि ओहोळांमधील पाणीसाठा घटू लागल्याने जलसंधारणाच्या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. .वाहून जाणारे पाणी अडवून त्याचे योग्य नियोजन केल्यास संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते..Water Scarcity: लातूरमध्ये ६० मीटरपेक्षा खोल बोअरवेल खोदण्यास बंदी; भूजल विक्रीवरही निर्बंध.यासाठी तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) वनराई बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांनी केली आहे..Water Scarcity Action Plan: पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा सादर करा; पुणे जिल्हा परिषदेच्या विभागांना सूचना.विक्रमगड तालुक्यात उन्हाळ्यात अनेक गावांतील विहिरींची पाणीपातळी खालावते, तर नदी-नाल्यांमधील पाणीसाठाही कमी होतो. परिणामी, पिण्याचे पाणी, पशुधन आणि शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवते..यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओहोळांवर वनराई बंधारे उभारून पावसाचे पाणी अडविणे आणि ते जमिनीत मुरविणे आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.