Jowar Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rains: हिरवे स्वप्न एका रात्रीत भंगले; जयसिंगपुरात ज्वारी पीक आडवे

पिकाची आशा सोडून आता वैरणीसाठी जे येईल ते पीक गुंठ्यावर विकायचे हे निश्चित करून पुन्हा घर गाठले. एका रात्रीत हिरव्या स्वप्नाचा चुराडा झाला होता.

Raj Chougule

Kolhapur News : जानेवारीत उसाची तोडणी लवकर झाल्यानंतर तातडीने ज्वारीची पेरणी (Jowar Sowing) केली. आठ ते दहा फूट ज्वारीची उंची झालेली. ज्वारी फुलोऱ्यात आलेली. यंदा १५ क्विंटलपर्यंत उतारा मिळेल, जनावरांना कडबाही होईल, अशी स्वप्ने पडू लागली.

त्याच दरम्यान हवामान विभागाने (Weather Department) पावसाचा अंदाज व्यक्त केला आणि धाकधूक वाढली. याच चिंतेत असताना गुरुवारी (ता. १६) पहाटे वारे सुरू झाले आणि वाऱ्यापाठोपाठ पाऊस आणि धाबेच दणाणले.

प्रचंड अस्वस्थतेतच सकाळी लवकर शेत गाठले. शेतातील पूर्ण ज्वारी पीक आडवे झालेले. कणसाचे भरलेले दाणे व असहायपणे शेवटची घटका मोजत होते. हे पाहून मोठा धक्काच बसला.

पिकाची आशा सोडून आता वैरणीसाठी जे येईल ते पीक गुंठ्यावर विकायचे हे निश्चित करून पुन्हा घर गाठले. एका रात्रीत हिरव्या स्वप्नाचा चुराडा झाला होता.

ही कहाणी सांगताना जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील संदीप खामकर या युवा शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. अशा अनेक शेतकऱ्यांचे रब्बी पीक उत्पादनाचे स्वप्न केवळ अर्ध्या तासाच्या पावसाने भंगले.

अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नियोजनच बिघडून गेले. पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरी अजूनही अनेकांची रब्बीची पिके कापणीच्या अवस्थेत आलेली नाहीत. ऑक्टोबरच्या पावसामुळे रब्बी पिकांची पेरणी पंधरा दिवस विलंबाने झाली.

पावसामुळे झालेला उशिराचा कालावधी पुन्हा पावसाच्या तडाख्यात सापडून गेला. पावसाच्या शक्यतेने काही शेतकऱ्यांनी प्रचंड वेगाने हालचाली करत जी पिके काढणीस आली आहेत ती काढून घेतली. प्रसंगी मजुरांना दुप्पट रक्कम दिली.

मात्र जी पिके काढणीसाठी अद्याप आठ ते दहा दिवसांचा कालावधीत होता, त्यांचा मात्र या पावसाने विचका केला. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी उसापाठोपाठ चारा व घरापुरते ज्वारी पीक घेतात. यासह गहू हरभरा ही पिकेही घेतली घेतात.

उसाच्या तुलनेत रब्बीच्या लागवडी कमी असल्या तरी त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरतात. यंदा हवामान चांगले व रोगराईचे प्रमाण कमी असल्याने रब्बी पिके चांगली आली आहेत. त्यामुळे यंदा उत्पन्न चांगले येईल, अशी अपेक्षा होती. परंतु एका रात्रीत चित्रच पालटले.

‘कृषी’चे कर्मचारी ‘नॉट रीचेबल’

जुन्या पेन्शनसाठी कृषी विभागाचे काही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. क्षेत्रिय पातळीवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे फोन ‘स्विच ऑफ’ अथवा ‘नॉट रीचेबल’ लागत होते.

कर्मचारी नसल्याने कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पावसाने किती नुकसान झाले आहे हे सांगता आले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT