Jowar  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Rate : ज्वारीला उच्चांकी प्रतिकिलो ६० ते ६५ रुपये दर

Jowar Price Today : यंदा ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी पावसाची अनियमितता असल्याने उतारा कमी बसल्याने उत्पादन घटले.

Team Agrowon

Amravati News : लागवड क्षेत्र आणि उत्पादकता कमी झाल्याने ज्वारीच्या किरकोळ दरात तेजी आली आहे. सद्यःस्थितीत किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची ज्वारी ६० ते ६५ रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे.


यंदा ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी पावसाची अनियमितता असल्याने उतारा कमी बसल्याने उत्पादन घटले. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकासह सर्वत्र ज्वारीचे उत्पादन कमी झाले. परिणामी दरात सुधारणा झाली. यंदा प्रथमच मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून ज्वारीची आवक झाली आहे.

काही वर्षांपूर्वी ज्वारीला मागणी राहत नसायची त्या वेळी गहू फक्त सणासुदीला लोकांच्या ताटात दिसत असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. भाकरी पचनास हलकी असल्याने आता आरोग्याचे प्रतीक झाली आहे.

गव्हापेक्षाही ज्वारीचे भाव वाढले आहेत. सध्या ज्वारीला चांगला दर मिळत असला तरी, नगदी पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने पेरली जाणारी ज्वारी आता केवळ पीक राहावे, या उद्देशाने पेरली जात आहे. मात्र, दुसरीकडे स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारी व बाजरीच्या भाकरीचा आग्रह वाढत आहे. त्यामुळे ज्वारीची मागणी वाढली आहे.

राज्यातील ज्या ठिकाणांहून ज्वारी येत होती, तेथेही ती आता पुरेशा प्रमाणात मिळत नाही. वर्षानुवर्षे ज्वारीचे पीक घेणारे शेतकरी आता नावालाच ज्वारीची पेरणी करतात. त्यांचा कल आता नगदी पिकांकडे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT