Team Agrowon
देशातील बाजारात सध्या ज्वारी चांगलाच भाव खात आहे. देशात मागील दोन वर्षे ज्वारीचे उत्पादन कमीच राहीले.
२०१३-१४ मध्ये ५६ लाख टनांवर असेललं ज्वारीचं उत्पादन २०२०-२१ मध्ये ४८ लाख टनांपर्यंत कमी झालं. तर मागील दोन वर्षांमध्ये ज्वारी उत्पादन घटत राहीलं.
यंदा जवळपास ४० लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. पण भरडधान्याविषयी ग्राहकांमध्ये जागृती झाल्याने मागणी वाढली आहे.
ज्वारीला मागणी वाढत असताना पुरवठा मात्र कमी झाला.
यंदा खरिप आणि रबी दोन्ही हंगामातील ज्वारी उत्पादन कमी राहीले. यंदा गेल्यावर्षीपेक्षाही देशातील उत्पादन कमी आहे. त्यामुळे ज्वारीच्या दरात तेजी आली आहे. तसा सध्याच्या काळ ज्वारी आवकेचा असतो.
रब्बीतील ज्वारीची आवक बाजारांमध्ये येत असते. पण यंदा आवक थांबल्यासारखी स्थिती आहे.
सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. खरिपातील माल बाजारात येईपर्यंत ज्वारीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्वारीचे दरही तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.