Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : जायकवाडी प्रकल्प तुडुंब!

Dam Water Stock : गेल्या काही दिवसांपासून जवळपास पूर्ण भरण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलेला जायकवाडी प्रकल्प अखेर तुडुंब झाला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : गेल्या काही दिवसांपासून जवळपास पूर्ण भरण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलेला जायकवाडी प्रकल्प अखेर तुडुंब झाला आहे. रविवारी (ता.१३) सायंकाळी जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने जाहीर केलेल्या पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून जायकवाडीच्या तुडुंबतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून पाणीसाठा स्थिर ठेवण्याचे प्रयत्न प्रकल्प प्रशासनाकडून सुरू होते. त्यासाठी येणारी आवक आणि त्यानुसार पाणीसाठा स्थिर ठेवण्यासाठी विसर्ग करण्याचे काम जायकवाडी प्रकल्प प्रशासन करत होते. रविवारी सकाळी ६ च्या सुमारास जायकवाडी प्रकल्पात २५२८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्याचवेळी चार गेटमधून २०९६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात केला जात होता. त्यावेळी प्रकल्पातील पाणीसाठा ९९.९५ टक्क्यांवर गेला होता.

रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रकल्प प्रशासनाने जाहीर केलेल्या पाणीसाठ्याच्या माहितीनुसार प्रकल्पाच्या क्षमतेनुसार १०२.७२ टीएमसी एकूण पाणीसाठा जमा झाला असून, त्यापैकी ७६.६६ टीएमसी जिवंत साठ्याचा समावेश होता. त्या वेळी प्रकल्पात ३०७२ क्युसेकने आवक सुरू होती, तर २०९६ क्युसेकने विसर्ग सुरू होता.

हा विसर्ग करण्यासाठी प्रकल्पाच्या एकूण २७ पैकी क्रमांक १०, २७, १८, १९ हे चार दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले होते. सोमवारी (ता. १४) सकाळी सहा वाजताच्या पाणीसाठ्याच्या माहितीनुसार, क्षमतेप्रमाणे तुडुंब असलेल्या जायकवाडी प्रकल्पात ३२२६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. तर चार गेटमधून २०९६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. १ जूनपासून आजपर्यंत प्रकल्पांमध्ये जवळपास ९८.३६ टीएमसी पाण्याची आवक झाली.

त्यापैकी आतापर्यंत जवळपास १९.०२ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने अधिकृतरीत्या पूर्ण क्षमतेने प्रकल्प भरल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने आता प्रकल्पावरून अपेक्षित सिंचन क्षमतेप्रमाणेच होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. याशिवाय प्रकल्पावरून असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा ही सुरळीत राहील अशी आशा निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा उठाव वाढला; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत हिरवी मिरचीचे दर?

Agriculture AI : शेती क्षेत्रात ‘एआय’चा वापर लाभदायी

Name Change Of Constituency : राज्यातील पाच विधानसभा अन् तीन लोकसभा मतदारसंघाच्या नावात बदल होणार

Cotton Cultivation : सघन कापूस लागवड फायद्याची

Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड!, जमा केले ऊस बिलापोटी प्रती टन ५० रुपये

SCROLL FOR NEXT