Pune News : यंदा कोरडे पडलेले जायकवाडी धरण काहीच दिवसात तुडूंब भरल्याने मराठवाड्याची चिंता मिटली आहे. पण २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीपात्रात ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे.
पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले आहेत. जून आणि जूलैच्या महिन्यात पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा मृत झाला होता. पण ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे जायकवाडीत पाण्याची आवक सुरू झाली. याच महिन्यात जायकवाडी भरले देखील.
दरम्यान रविवारी धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी (ता.९) सहा दरवाजे उघण्यात आले होते. तेंव्हा ३ हजार १४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर मंगळवारी देखील पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने आणखी १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या अर्ध्या फुटाने दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
दरम्यान धरणातील विसर्ग वाढवण्यात आल्याने पैठण शहरासह तालुक्यातील १६ गावांना सावधानतेचा इशारा उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीलम बाफना यांनी दिला आहे. सध्या धरणासह नदीतील पाण्याच्या विसर्गावर धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे लक्ष ठेवून आहेत.
'या' गावांना सावधानतेचा इशारा
पाटेगाव, कावसान, नायगाव, मायगाव, वडवाळी, वाघाडी, नवगाव, आगरनांदूर, आवडे उंचेगाव, चनकवाडी, टाकळी अंबड, हिरडपुरी व आपेगाव या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
धरण पूर्ण क्षमतेने भरले
जून, जुलै महिना पावसाविनाच गेल्याने धरणातील पाणीसाठा मृत होता. पण दोन महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात पाऊस सक्रिय झाल्याने काहीच दिवसात धरण धरण पूर्ण क्षमतेने भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक व जनावरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.