Sugar Factory Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jarndeshawar Sugar Factory : 'जरंडेश्वर'च्या संचालकांचा जामीन मंजूर ; मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

Jarandeshwar Sakhar Karkhana : राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ने जप्तीची कारवाई केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकासह तिघांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Jarandeshwar Case : राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ने साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या संचालक सचिन सिनगारे व गुरू कमोडिटीजचे जवाहरलाल छाजेड, सीए योगेश बगरेचा यांचा मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बॅंकेने २०१० साली लिलावात काढला होता. हा कारखाना गुरू कमोडिटी प्रा. लि. या कंपनीने अवघ्या ६५ कोटी ७४ लाखाला विकत घेतला. त्यामुळे माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात रान उठवले आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुमारे ९६ कोटी रुपयांचे कर्ज जरंडेश्वर साखर कारखान्याला दिले. त्यावरून ईडीने जरंडेश्वरची मूळ किंमत कमी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात या बँकांनी कर्ज दिल्याचा ठपका घेऊन जप्तीची कारवाई केली.

तसेच संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जामीन मिळावा, यासाठी कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे व गुरू कमोडिटीजचे जवाहरलाल छाजेड, सीए योगेश बगरेचा यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

न्यायालयाने प्रत्येकी दोन लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. मात्र आरोपींनी देश सोडून जाऊ नये, पुराव्याशी छेडछाड करू नये, साक्षीदारांवर दबाव टाकू नये अशा अट लावण्यात आल्या आहेत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain: मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा! ५ जिल्ह्यांतील ४० मंडळांत अतिवृष्टी

Agriculture Dealers Protest: नांदेड जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बंद

Rain Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसाने ४८ हजार हेक्टरवरील पिकांची दैना

Crop Loss: पावसाने बळीराजाचा घात

Paddy Crop Loss: पावसामुळे भातपीक संकटात

SCROLL FOR NEXT