Jamun Kulfi Agrowon
ॲग्रो विशेष

Jamun Kulfi: मोहोळमध्ये शेतकरी कंपनीकडून जांभूळ कुल्फी

Farmer Food Innovation: मोहोळच्या राजाराणी नॅचरल फूड्स शेतकरी कंपनीने कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली मधुमेहींसाठी जांभूळ कुल्फी व शॉट बाजारात आणले आहेत.

Team Agrowon

Solapur News: कृषी विज्ञान केंद्र, मोहोळच्या तांत्रिक सहकार्याने देगाव (ता. मोहोळ) येथील राजाराणी नॅचरल फूड प्रॉडक्ट्स या शेतकरी उत्पादक कंपनीने जांभूळ कुल्फी व जांभूळ शॉट ही नवीन दोन प्रक्रिया उत्पादने तयार केली आहेत. मोहोळ केंद्रात नुकतेच त्याचे अनावरण करण्यात आले, ही दोन्ही उत्पादन मधुमेहींसाठी उपयुक्त ठरणारी आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.

संपूर्णपणे कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली विविध फळांवर संशोधन करून खास मधुमेहींसाठी दोन नवे प्रॉडक्ट तयार करण्यात आले आहेत. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. तानाजी वळकुंडे, विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर, डॉ. पंकज मडावी, काजल म्हात्रे, डॉ. विशाल वैरागर, डॉ. स्वाती कदम, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. के. बी. खोत, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार उपस्थित होते.

कंपनीचे प्रमुख राजकुमार आतकरे म्हणाले, की शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना सत्यात उतरवणारी राजाराणी ही एक शेतकऱ्यांची कंपनी आहे. या कंपनीची यशस्वी चार वर्षे पूर्ण झाली असून, कंपनीने स्वतःचा ब्रँड निर्माण केला. आज राजाराणी या नावाच्या ब्रँडची अनेक उत्पादने जसे की फळांपासून तयार केलेल्या कुल्फी, आईस्क्रीम, रबडी, बासुंदी तसेच फळांच्या मिठाई उपलब्ध आहेत.

ग्राहकांना नाविन्यपूर्ण व नैसर्गिक पदार्थ कसे पुरवता येतील, यावर अधिक काम केल्याचे सांगण्यात आले. केंद्राचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत प्रशिक्षण व उद्योग उभारणीस मदत झाली, असेही ते म्हणाले. या वेळी वळकुंडे यांनी आतकरे यांच्या प्रयोगाचे कौतुक केले. श्री. खोत यांनीही मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT