Rain In Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Rain In Maharashtra : जालना, छत्रपती संभाजीनगरला वादळी वारा, पाऊस, गारपिटीचा दणका

Jalna Rain : जालना, छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांतील काही ठिकाणी सोमवारी (ता. ५) दुपारी वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तुरळक गारपीटही झाली.

Team Agrowon

Jalna Chatraati Sambhajinagar Rain : जालना / छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांतील काही ठिकाणी सोमवारी (ता. ५) दुपारी वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तुरळक गारपीटही झाली. मागील एक महिन्यांपासून चाळिशी पार तापमानाने हैराण झालेल्या जालना शहरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.

जालना शहरात दुपारी २.३० वाजेपर्यंतचे कमाल तापमान ४०.१० अंश सेल्सिअस होते. दुपारी तीन वाजेनंतर शहरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली. अर्धा तास शहरात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. तर, सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत विजांचा कडकडाट सुरू होता. यानंतरही अधून-मधून हलक्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या जालनाकरांना दिलासा मिळाला.

जालना जिल्ह्यांत धुमाकूळ

जालना तालुक्यातील रामनगर, इंदेवाडी, देवमुर्ती, सामनगाव आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. परतूर शहर, मंठा, जाफराबाद, घनसावंगी, अंबड तालुक्यात ठिक-ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अंबड तालुक्यातील आमलगाव येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. बदनापूर शहर परिसरात पावसासह पंधरा ते वीस मिनिटे तुरळक गारपीटही झाली. कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी वाऱ्याचे तांडव तासभर चालले.

माहोरा येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. रोहिलागड किनगाव नांदी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने हजेरी लावली. यामुळे कांदा बीज उत्पादक शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले व कापणी केलेले बीज देखिल भिजले गेले आहे. तसेच लग्न तिथी असल्याने मंडपाचे देखील थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले. आंबा कैऱ्या देखिल गळून पडल्या.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लासूर स्टेशन परिसरात वारा गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. तुरळक गारपीटही झाली. पावसाने चांगलेच झोडपल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शहर लगतच्या परिसरामध्ये पावसाची हजेरी जोरदार होती. जोरदार वादळी पाऊस सुरु होताच, वीज पुरवठा खंडित झाला. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे लग्नसोहळे व इतर कार्यक्रमांनाही फटका बसला. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वेरूळ परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT