
Kolhapur Milk Rate : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) गाय व म्हैशीच्या विक्री दूध दरात प्रतिलिटर २ रुपयांत वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासून (ता. ५) नवे दर लागू होणार आहेत. यामुळे कोल्हापूरसह पुणे, मुंबईच्या ग्राहकांना जादा दराने दूध खरेदी करावी लागणार आहे. दरम्यान गोकुळ दूध संघाने मार्च महिन्यात गायीच्या खरेदी दरात २ रूपयांनी वाढ केली होती.
मुंबई व पुण्यात प्रतिलिटर म्हैस दुधाचा दर ७२ रुपयांवरून ७४ रुपये होणार आहे. तर कोल्हापुरात हा दर ६६ रुपयांवरून ६८ रुपये असणार आहे. मुंबई, पुण्यात गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ५६ वरून ५८ रुपये; तर कोल्हापुरात हा दर ४८ रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाकडून मुबईमध्ये ८ लाख लिटर दुधाची विक्री होते.
मार्च महिन्यात दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली होती. मात्र, विक्री दरात वाढ केली नव्हती. राज्यात अमुलसह मदर डेअरीने दूध विक्री दरात १ मेपासून प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे ‘गोकुळ’नेही दूध विक्री दरात वाढ केली आहे.
गोकुळ दूध संघांकडून म्हैस दूध संकलन २० लाख करण्याचा संकल्प होता तो १९ लाखांपर्यंत पोहोचला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील म्हशींच्या दुधाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथे दुधाची मागणी वाढत आहे. त्यासाठी लवकरच २ नवीन युनिट उभारणार असल्याची माहिती गोकुळ दूध संघाकडून देण्यात आली.
दूध दरफलक (प्रतिलिटर रुपयांत) नवे दर
म्हैस दूध पुणे, मुंबई ७४. कोल्हापूर ६८. गाय दूध- पुणे, मुंबई ५८, कोल्हापूर ५०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.