Jaljeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jaljeevan Mission : बिलघरमध्ये ‘जलजीवन मिशन’ फेल

जलजीवन मिशनअंतर्गत संपूर्ण देशभरात पाणी योजनांचे काम सुरू आहे. वाडा तालुक्यातही प्रत्येक गावात पाणी योजनेचे काम सुरू असून बिलघर या ग्रामपंचायतीत बोरीचा पाडा, खिंडीचा पाडा, वांगण पाडा व हरिजन वस्तीसाठी नवीन विहीर खोदण्यात आली आहे

Team Agrowon

Palghar News : वाडा तालुक्यातील बिलघर ग्रामपंचायत हद्दीतील बोरीचा पाडा, खिंडीचा पाडा, वांगणपाडा व हरिजन वस्ती येथील नागरिकांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे (Water Supply Scheme) काम सुरू आहे. या पाड्यांसाठी नवीन विहिरीचे खोदकाम सुरू आहे.

मात्र ठेकेदाराने मनमानी करून दुसऱ्या जागेत विहीर खोदल्याने विहिरींना अंत्यत कमी पाणी लागले आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबू शकणार नाही.

त्यामुळे विहिरींची जागा बदलून नवीन विहीर खोदावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत संपूर्ण देशभरात पाणी योजनांचे काम सुरू आहे. वाडा तालुक्यातही प्रत्येक गावात पाणी योजनेचे काम सुरू असून बिलघर या ग्रामपंचायतीत बोरीचा पाडा, खिंडीचा पाडा, वांगण पाडा व हरिजन वस्तीसाठी नवीन विहीर खोदण्यात आली आहे;

मात्र या विहिरीला अत्यंत कमी पाणी लागल्यामुळे पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार नाही. ग्रामस्थांनी विहिरीची पाहणी केली असता बाब निदर्शनास आली. ग्रामस्थांनी ही बाब ठेकेदाराच्या लक्षात आणून दिली; मात्र ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

विहिरीची जागा का बदलली?

पांडुरंग दावजी वांगड यांच्या जागेमध्ये भूजल तज्ज्ञांकडून दाखला देण्यात आला असताना ठेकेदाराने विहिरीची जागा का बदलली, असा सवाल तक्रारीत ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच ठेकेदाराने भूजलतज्ज्ञांकडून जागेचे सर्वेक्षण न करताच तसेच विहिरीसाठी केंद्र सरकारचा राखीव भूखंड असताना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काम सुरू केले आहे.

त्या कामास तातडीने स्थगिती देऊन विहिरीची जागा बदलण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तक्रारीत केली आहे. या तक्रारीवर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT