Shri Ram Jalabhishek Agrowon
ॲग्रो विशेष

Ram Mandir Inauguration : शेतकऱ्यांच्या ३४,९९९ विहिरीतील पाण्याने अयोध्येत श्रीरामाचा जलाभिषेक

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण देशभरातील अनेक भाविक भक्त अनुभवणार आहेत.

मुकूंद पिंगळे

Nashik News : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण देशभरातील अनेक भाविक भक्त अनुभवणार आहेत. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रभरातून ३४,९९९ शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी संकलित करण्यात आले.

त्यांनतर या पाण्याचे कलश अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. या पाण्याच्या जलाभिषेकाद्वारे शेतकऱ्यांचा भाव समर्पित होणार आहे.

जनार्दन स्वामींचे ३४ वे पुण्यस्मरण नुकतेच नाशिकमध्ये झाले. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना एका गावातून किमान ३४ शेतकऱ्यांच्या विहिरीतून पाणी आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जवळपास १ हजारांहून अधिक गावातून हे कलश आले. त्यासोबत भाविकांनी नाण्याचे कलश आणले होते.

हे कलश ओझर मिग (ता. निफाड) येथील जनशांतीधाम आश्रमात जमा करण्यात आले होते. हे कलश मंगळवारी (ता. ९) भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक काढून मार्गस्थ झाले होते. महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमिय संत स्वामी हरिहरानंद, ब्र. नागेश्वरानंद, भक्त परिवारातील ज्येष्ठ सदस्य शिवा अंगुलगावकर यांच्या हस्ते हे कलश पाठविण्यात आले होते.

पंचवटी ते अयोध्या या मार्गात अनेक भाविकांनी त्याचे स्वागत केले. शनिवारी (ता. १३) कलश पोहोचल्यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे न्यासाच्या कार्यालयात हस्तांतरित करण्यात आले. त्यानुसार कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या पाण्याने मूर्तीचा जलाभिषेक होणार आहे.

पंचवटी ते अयोध्या जलकलश यात्रा

प्रभू श्रीराम १४ वर्षे नाशिकमध्ये वनवासात राहिल्याने नाशिकची रामभूमी अशी ओळख आहे. येथे दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्यामुळे विशेष अध्यामिक ओळख असलेल्या नाशिकमधील पंचवटीमधून हे कलश अयोध्यापर्यंत पोहचले आहेत.

हे सर्व कलश प्रामुख्याने नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, जालना, पुणे, ठाणे, जालना, परभणी आदी जिल्ह्यांतून शेतकऱ्यांनी आणले होते. जनार्दन स्वामी यांनी कर्मयोगाची शिकवण देताना कृषी, गोसेवा, शिक्षण, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण अशा क्षेत्रात मोठे काम केले आहे. हीच परंपरा शांतीगिरी महाराज पुढे नेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT