Ram Temple : रामलल्लासाठी दिव्यांग मुलांनी तयार केला खास रेशमी पोशाख, नाशिकच्या ३०० मुलांची मेहनत

Installation of Lord Rama : गेल्या ५०० वर्षांच्या तपश्चर्याचे फळ आता राम भक्तांना मिळणार आहे. अयोध्येत राम मंदिर उभारले गेले असून प्रभू रामाची प्रतिष्ठापना २२ जानेवारीला होणार आहे. सध्या याची जोरदार तयारी सुरू असून राम भक्त हे प्रभू रामासाठी काय अर्पण करावे आणि काय नको अशा स्थितीत आहेत.
Ram Temple
Ram TempleAgrowon

Nashik News : अयोध्येत राम मंदिरच्या उभारणीचे स्वप्न साकार होत आहे. तब्बल ५०० वर्षांच्या अथक प्रतिक्षेनंतर राम भक्तांना अयोध्येत राम भेटणार आहेत. प्रभू रामाची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे सध्या देशभरासह जगभारात मोठ्या उत्सहाचे वातावरण आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राम भक्तांकडून खास तयारी करण्यात आली आहे. तसेच या तयारीत नाशिकच्या दिव्यांग मुलांनीही खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्याकडून राम लल्लाला खास भेट देण्यात येणार आहे.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना कार्यक्रमाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथे कार्यक्रमासाठी निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान राम भक्तांकडून राम लल्लाच्या स्वागतासाठी मनोभावे काहीना काही अर्पण केले जात आहे. कोणी पैसा दान करत आहे. तर कोणी सोने-चांदी. पण सध्या नाशिकच्या दिव्यांग मुलांची खास चर्चा सुरू आहे.

रेशमी पोशाख

नाशिकच्या या दिव्यांग मुलांनी श्री रामासाठी खास कपडे बनवले आहेत. ज्यात त्यांनी रेशमी पोशाख बनवला आहे. नाशिकच्या येवल्यातील सुमारे ३०० दिव्यांगांच्या चमूने हा रेशमी पोशाख बनवला आहे. तो कापसे फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आला आहे. तर हे कपडे श्री राम, माता सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि रामभक्त हनुमान यांच्यासाठी आहेत.

Ram Temple
Ashadhi Wari 2023 : पंढरपुरातील रस्ते, पाण्यासह मंदिर विकासासाठी २९० कोटी

इतर पूजा साहित्य

तसेच या दिव्यांगांच्या चमूने गोमूत्र, शेणाची पोळी, शेणाचे दिवे आणि इतर पूजा साहित्यही देखील या खास कार्यक्रमासाठी मंदिर प्रशासनाकडे पाठवले होते. जे श्री राम तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पूजेसाठी स्वीकारल्याचे कळत आहे.

अनाथ आणि अपंग मुलं

दरम्यान कापसे फाउंडेशनचे रामभक्त बाळकृष्ण यांनी, हे कपडे सोन्याच्या पाण्याने बनवलेले असून त्यासाठी ६ महिने लागल्याचे सांगितले. तसेच या कापडाच्या निर्मितीसाठी अनाथ आणि अपंग मुलांनी मदत केल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

कापड राम मंदिर ट्रस्टला सुपूर्द

तर या कापडामागे ६ महिन्यांपूर्वीचा प्रवास असल्याचे बाळकृष्ण यांनी सांगितले. रोपवाटिकेत काही फुलांची रोपे लावणे. फुले जमा करून ती वाळवणे आणि त्यानंतर त्यात नैसर्गिक रंग घालून हातमागाच्या साह्याने ते विनण्यात आले. त्यानंतर आता राम लल्लाच्या प्रतिष्ठापनेचा दिवस जवळ येत असताना हे कापड राम मंदिर ट्रस्टला सुपूर्द करण्यात आल्याचे बाळकृष्ण यांनी सांगितले.

Ram Temple
Vithhal Rukmini Mandir : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पालकमंत्र्याकडून पाहणी

...ही या कापडाची खासियत

राम मंदिर ट्रस्टला हे खास कापड मिळाल्यानंतर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, फुलांची रोपे लावणे, फूले काढणे, ती फुले सुकवणे, त्या फुलापासून रंग तयार करणे आणि नंतर दिव्यांगांनी हे कापड तयार करणे ही या कापडाची खासियत असल्याचे म्हटले आहे.

रेशमी कापडात सोने आणि चांदी

सुमारे ६ महिने हे कापड बनवण्याचे काम सुरू होते. एवढेच नाही तर या कपड्यात चांदी आणि सोन्याचा धागा वापरण्यात आला आहे. या कापडावर भगवान रामाचा पितांबर आहे. जो 10 मीटर मोठा आहे. याशिवाय एक शेलाही तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये पवित्र कमळाची फुले आणि रामाचे नाव कोरले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com