Kolhapur Jaggery Plants agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Jaggery Plants : गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या थंडावल्या पण 'ना नफा.. ना तोटा..' अशी स्थिती

Jaggery Plants Kolhapur : गुंतवणुकीची कर्जे यांसह अन्य अडचणींना तोंड देताना गुऱ्हाळघर मालक आर्थिक तोट्यात सापडले आहेत.

sandeep Shirguppe

Jaggery Plants Kolhapur : ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गाळपासाठी ऊस उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गेले चार महिने गुऱ्हाळ आणि ऊस कारखान्यांचा हंगाम अंतीम टप्प्यात आला आहे.

गुळाचा गोडवा निर्माण करणारा गुऱ्हाळमालक कामगारांना द्यावी लागणारी अॅडव्हान्स (अनामत), कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ, गुऱ्हाळघर टिकण्यासाठी द्यावा लागणारा दर, बाजारात गुळाला मागणी, पडलेला दर, केलेल्या गुंतवणुकीची कर्जे यांसह अन्य अडचणींना तोंड देताना गुऱ्हाळघर मालक आर्थिक तोट्यात सापडले आहेत.

यंदाही 'ना नफा.. ना तोटा..' अशी स्थिती झाली आहे. गुळाची गोडी निर्माण करणाऱ्या गुऱ्हाळघरांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. यंदा पावसाचा आणि बदलत्या हवामानाचा फटका बसल्यामुळे ऊस उत्पादनात मोठी घट झाली. विविध अडचणींमुळे जिल्ह्यात जवळजवळ ७० ते ७५ टक्के गुन्हऱ्हाळघरे बंद झाली. उभा केलेला व्यवसाय बंद केला तर भांडवलातील गुंतवणूक व कामगारांना आगाऊ दिलेली रक्कम बुडीत जाईल, या भीतीमुळे गुऱ्हाळघरांच्या चिमण्या सुरू ठेवल्या. परंतु हा व्यवसाय वाचविण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेण्याची गरज आहे.

व्यापाऱ्यांची मनमानी, मजुरांची कमतरता, गुळासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीतील वाढ, गुंतवणूक केल्याने बँकांचा वाढलेला तगादा, जुन्या अनामतीमधून यंदाही न फिटलेली रक्कम, पुढच्या हंगामासाठी करावी लागणारी तजवीज आदी कारणांमुळे गुऱ्हाळ घरचालक मेटाकुटीला आले आहेत.

मार्केटमधील गुळाचे सौदे करणारे व्यापारी वेगवेगळ्या कारणांनी गुळाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह तयार करून गुळाचा दर घसरण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे शेतकरी व गुऱ्हाळचालक तोट्यात आले आहेत. अनेक अडचणींचा ताळमेळ घालून गुन्हाळघर मालकांच्या पदरी निराशाच येते.

गुऱ्हाळघरे चालू करण्यासाठी २० ते २५ लाख रुपयांची गुंतवणूक करूनही यामधून तोटाच होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. सध्या गुऱ्हाळ घरावर काम करणाऱ्या मजुराला दिवसाला ३०० रुपये मजुरी व दोन किलो गूळ द्यावा लागतो. गुऱ्हाळघर मालकाचा विचार केल्यास एका आदणाला सुमारे तीन हजार रुपये खर्च येतो. या हिशेबाचा विचार केल्यास शेतकऱ्यांचा गूळ सहा हजारांच्या आसपास विकला तरच ऊस शेती परवडेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या गुळाचा असणारा ३७०० ते ३९०० दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. गळीत हंगाम संपत आल्याने गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या थंडावल्या आहेत. गेली आठ ते ते दहा वर्षे गूळ दर स्थिर असून, कच्च्या मालाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे खर्चाचा ताळमेळ घालणे अवघड बनल्याने गुऱ्हाळ घरे तोट्यात चालवणे अवघड झाले आहे.

अमर पाटील, गुऱ्हाळ मालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT