Kolhapur Jaggery Market agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery Production Kolhapur : गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली; गूळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम

Jaggery Production : कोल्हापूर शाहू मार्केट यार्डात दिवाळी पाडव्यादिवशी मुहूर्ताचे गूळ सौदे झाल्यानंतर गुळाला चांगला दर मिळत आहे. परंतु विधानसभा निवडणुकीमुळे गूळ उत्पादनचं कमी झाल्याने आवक कमी झाली आहे.

sandeep Shirguppe

Jaggery Rate : कोल्हापूर शाहू मार्केट यार्डात दिवाळी पाडव्यादिवशी मुहूर्ताचे गूळ सौदे झाल्यानंतर गुळाला चांगला दर मिळत आहे. परंतु विधानसभा निवडणुकीमुळे गूळ उत्पादनचं कमी झाल्याने आवक कमी झाली आहे. दरम्यान या आठवड्यात गुळाची आवक वाढल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. तूर्तास गूळ आवक जेमतेम असल्याने मोजक्या उत्पादकांनाच मार्केटमध्ये लाभ मिळत असल्याचे चित्र आहे.

बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकांमुळे मराठवाड्यातील नेत्यांनी गुळकरी व ऊस तोडणी कामगारांना मतदान करण्यासाठी थांबवले होते. त्यासाठी रसदही पुरवली होती यामुळे कामगार तेथेच थांबून होते. काही ऊस तोडणी कामगार मतदानांतर येत आहे तर काही निवडणूक निकालानंतर कामगारांचे गट येणार आहेत. बाजार समितीत गूळ सौदे सुरू झाले आहेत. परंतु पूर्ण क्षमतेने गुळाचे उत्पादन सुरू झालेले नाही. गुळाची आवक होत आहे; मात्र त्याचे प्रमाण कमी असल्याचे पाटील यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक साखर कारखाने सुरू झालेले नाहीत. गूळ हंगामातील मुहूर्ताचे सौदे होऊन वीस दिवस झाले; मात्र मोजकी गुऱ्हाळघरे सुरू असल्याने गुळाची आवक कमी आहे. परिणामी यंदाच्या गूळ हंगामाचा गोडवा अजूनही वाढलेला नाही. याचबरोबर शेतकऱ्यांना ऊस घालवून रब्बी पेरणीचेही वेध लागले आहेत. यामुळे शेत रिकामे करण्यासाठी कोणत्याही गुऱ्हाळ घराला किंवा साखर कारखान्यांला ऊस देण्याची घाई शेतकरी करण्याची शक्यता आहे.

शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात मुहूर्ताच्या सौद्यासाठी पाच हजार गूळ रव्यांची आवक झाली होती. त्यानंतरच्या आठवड्याभरात किमान ५० हजार ते एक लाख गूळ रव्यांची आवक होणे अपेक्षित होते; मात्र जिल्ह्यातील मोजकी दहा-बारा गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत.

बार्शी, सोलापूर, बीड, लातूर भागांतील गुळकरी कामगार गुऱ्हाळघरावर काम करण्यासाठी अवघे दोन हजारांवर कामगार आले. त्यांच्या सोबतीला स्थानिक कामगार घेऊन वीस-पंचवीस गुऱ्हाळघरांवर गूळ उत्पादन सुरू झाले. त्यात करवीर, पन्हाळा, कागल येथील गुऱ्हाळघरांचा समावेश आहे. मात्र, अद्यापही अन्य भागांत गुऱ्हाळघरे सुरू झालेली नाहीत.

गुळाचे भाव असे

प्रथम श्रेणीतील गुळाला ५ हजार ४०० रूपये तर द्वितीय श्रेणीतील गुळाला ४ हजार २०० रूपये दर आहे. तृतीय श्रेणीतील गुळाला ३ हजार ९०० रूपये दर आहे. चतुर्थ श्रेणीतील गुळाला ३ हजार ६०० रूपये दर मिळत आहे. जिल्ह्यात दिवसाला सरासरी बाजार समितीत २४ हजार गुळ रव्यांची आवक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT