Millet Year
Millet Year Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Year : भरडधान्यावर प्रक्रिया होणं गरजेचं

Team Agrowon

भरडधान्यांना आपल्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भरडधान्यामधील पोषणमुल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेतला.

भारताने दिलेल्या प्रस्तावाला ७२ देशांनी पाठिंबा दिल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले.

भरडधान्याच्या जागृतीविषयी जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भारतात अनेक प्रकारची तयारी सुरू आहे.

एकीकडे राज्य सरकारे शेतकऱ्यांना भरडधान्य लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. तर दुसरीकडे ते लोकांच्या ताटात आणण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे.

बऱ्याच लोकांच्या आहारात अजूनही केवळ गहू आणि तांदळाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत लोकांच्या ताटात ८ प्रकारची पौष्टिक भरडधान्य पोहोचवणं हे एक आव्हानात्मक काम आहे.

यासाठी बाजरीवर प्रक्रिया केलेले अन्न म्हणजेच प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांना प्रोत्साहन दिले जात आहे.

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ साठी निवडलेल्या भरड धान्यांपासून ही खाद्य उत्पादने तयार केली जातील.

भरडधान्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या निर्यातीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तसे ते अपेडामार्फत होताना दिसत आहेत.

त्यासाठी न्युट्री सिरल्स एक्सपोर्ट प्रमोशन फोरमही तयार करण्यात आलाय. पण ही निर्यात फार सोपी असणार नाही.

प्रक्रियेसाठी नेमकी कोणती भरडधान्ये निवडण्यात आलेली आहेत आणि या भरधान्याचे गुणधर्म काय आहेत? याविषयीची माहिती पाहुयात. 

भरडधान्ये म्हणजे नेमकी कोणती पिके?

भरडधान्य पिकांमध्ये ९ भारतीय पिकांचा समावेश होतो. 

१.ज्वारी (Sorghum) – ज्वारी हे सर्वदूर घेतले जाणारे पीक आहे. विशेषतः कोरडवाहू भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

महराष्ट्रातील सोलापूर, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तर पश्चिम महाराष्ट्रातील डोंगरभागात देखील याचे उत्पादन कमी-अधिक प्रमाणात होते.

यात सफेद, पिवळी, लाल अशा विविध रंगछटा असणारी ज्वारी पहावयास मिळते.

२. बाजरी (Pearl milllet)- कोरडवाहू जमिनीत अगदी कमी पाण्यावर येणारे बाजरीचे पीक पूर्वीपासून घेतले जात होते.

काळ्या मातीत याची गोडी काही वेगळीच असते. यात देखील हिरवा, लाल, तपकिरी असे मुख्य रंग व त्यांच्या छटा दिसतात.

3. नाचणी (Finger millet)– नाचणीला आधीपासूनच सुपरफुड म्हणून मान्यता मिळालेली आहे.

पूर्वी सर्व भागांत होणारी नाचणी आता फक्त आदिवासी डोंगरभाग व कोकणात केली जाते. यात सफेद व लालकेशरी व मरूनलाल अशा रंगत येते.

४. वरई (Little millet) – आजही आदिवासी व कोकण भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. डोंगरशेतीतील हे मुख्य नगदी पीक आहे.

यात कमी दिवसाच्या ते जास्त दिवसाच्या अशा विविध जाती आहेत.

५. वरी (Proso millet)– महाराष्ट्रातील काही भागांत वरईसारखेच दिसणारे हे धान्य पिकवले जाते.

दिसायला हे अगदी वरईसारखेच असले तरी त्याचे गुणधर्म व पोषकमूल्य भिन्न आहेत.

६. राळा/ भादली / कांग (Foxtail millet) – पूर्वी सर्व भागात राळा पिकवला जाई. राळ्याचा भात खाण्यासाठी चविष्ट लागतो.

खानदेशात तर पितरांना राळ्याचीच खीर करण्याची परंपरा होती. यात देखील विविध रंग असतात.

७. कोदो/ कोद्रा/ हरिक (kodo millet ) – एकावर एक असे सात थर असणारे हे धान्य. याचे वैशिष्ट्य म्हणजे आवरण काढले नाही तर हे अनेक वर्ष ठेवता येते.

याची शेती बऱ्याच प्रमाणात गडचिरोली, धुळे आणि कोकणात केली जाते.

८. बर्टी (Barnyard millet )– सर्वात कमी दिवसात पक्व होणारे हे धान्य. हे देखील अनेक रंगांत उपलब्ध असते.

कोरडवाहू व अतिपाऊस असणाऱ्या भागात देखील हे उत्तम येते. खाण्यासाठी चविष्ट व पौष्टिक असे हे धान्य आहे.

९. ब्राऊनटोप मिलेट (Browntop millet ) – मूळचे भारतीय असलेले हे मिलेट धान्य सध्यातरी फक्त दक्षिण भारतात घेतले जात आहे.

याचे वैशिष्ट्य म्हणजे हे धान्य खाल्यानंतर अनेक तास भूक लागत नाही. भरपूर उर्जा यातून मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT