Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : ‘कृषी’तील २०३ उमेदवारांच्या नियुक्‍तीचा प्रश्‍न ऐरणीवर

Job Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागात पदस्थापना त्यानंतर आवश्‍यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही सात महिन्यांपासून नियुक्‍तीस टाळाटाळ केली जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागात पदस्थापना त्यानंतर आवश्‍यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही सात महिन्यांपासून नियुक्‍तीस टाळाटाळ केली जात आहे. या विरोधात सोमवार (ता. १२)पासून पुणे कृषी आयुक्‍तालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा शिफारस पात्र २०३ उमेदवारांनी दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२१ झाली. ही परीक्षा देणारे २०३ उमेदवार उत्तीर्ण झाले. १२ जुलै २०२३ रोजी या संबंधीचा निकाल जाहीर करण्यात आला. या अन्वये गट-‘अ, ‘ब’ तसेच कनिष्ठ अशा एकूण २०३ उमेदवारांना कृषी विभागात पदस्थापना देण्याबाबत लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आली.

त्यानंतर १७ व १८ ऑगस्ट २०२३ रोजी उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम झाले. अशाप्रकारे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाले असताना शासन निर्णयाअभावी सात महिन्यांपासून या उमेदवारांच्या नियुक्‍तीस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे.

नियुक्‍ती अभावी या उमेदवारांवर बेरोजगारांसारखे जगण्याची वेळ आली आहे. तर कृषी विभागात रिक्‍त पदे असल्याने शेतकऱ्यांना देखील योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेता प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करीत या २०३ उमेदवारांना नियुक्‍ती द्यावी, अन्यथा सोमवार (ता.१२) पासून पुणे कृषी आयुक्‍तालयासमोर साखळी उपोषण करू, असा इशारा देण्यात आला आहे.

फाइल पडून

विशेष म्हणजे १० जानेवारीला नागरी सेवा मंडळाची बैठक झाली. त्यात परिपूर्ण प्रस्ताव मंत्रालयाला पाठविण्यात आला. अपर मुख्य सचिवांनी या प्रस्तावास तत्काळ मान्यता दिली. हा प्रस्ताव अंतरिम मंजुरीसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठविण्यात आला.

त्यांनी २६ जानेवारीपर्यंत नियुक्‍तीपत्र मिळतील, असे सांगितले होते. परंतु दोन आठवड्यांपासून फाइल त्यांच्याकडेच पडून आहे. त्यांनी फाइल का अडकवून ठेवली हे गूढ आहे. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास या नियुक्‍त्यांचे काम पुन्हा अडचणीत येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT