Agriculture Department : नांदेड कृषी विभागाकडून ९० कोटींचा आराखडा सादर

Nanded Development : नांदेड जिल्ह्यातील १४६ गावांत जलयुक्त शिवार योजना २.० राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समितीकडे विविध यंत्रणांकडून कृषी आराखडा सादर केला जात आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील १४६ गावांत जलयुक्त शिवार योजना २.० राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समितीकडे विविध यंत्रणांकडून कृषी आराखडा सादर केला जात आहे.

यात कृषी विभागाकडून १० हजार ८१३ हेक्टरवर पाच हजार एक कामासाठी ९० कोटी ९२ लाख रुपयांचा कृती आराखडा सदस्य सचिवांकडे सादर केला आहे. या आराखड्याला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हास्तरीय समितीच्या मंजुरीनंतर कामाला सुरुवात होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सन २०१५-१६ पासून ते सन २०१८-१९ पर्यंत राबविण्यात आले होते. पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता तसेच पावसातील खंडामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो.

Rural Development
Satara DPDC Meeting : सातारा जिल्ह्याचा ७३२ कोटींचा आराखडा

अनिच्छित व खंडित पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्‍चितता या सर्व बाबी विचारात घेऊन या जलयुक्त शिवार अभियानामध्ये एकात्मिक पद्धतीने ग्रामस्थ, शेतकरी व सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याचे काम सध्या सुरू आहे.

यात विविध मृद्‍ व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार व ओघळ नियंत्रण उपचार, तसेच जुन्या उपचारांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे आदी कामे जिल्ह्यातील १४३ गावांत करण्यात येणार आहेत.

Rural Development
Jalna Development : जालन्याच्या विकासासाठी ३९६ कोटींचा आराखडा मंजूर

याच कामाचा भाग असलेल्या कृषी विभागाकडून १० हजार ८१३ हेक्टर क्षेत्रावर पाच हजार एक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी ९० कोटी ९० लाखांचा निधी कृती आराखड्यात निश्‍चित करण्यात आला आहे.

लवकरच जिल्हा स्तरीय समितीच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर कामांना कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

कृषी विभागाकडून या प्रकारचे होणार कामे

ढाळीचे बांध ८२० गट, कंपार्टमेंट बंडिंग ४०, सिमेंट नाला बांध १७, नाला खोलीकरण ३५, मातीनाला बांध २५८, शेततळे, ६१०, गॅबियन बंधारे १७७, सलग समतल चर ७६, सिमेंट नाला बांध दुरुस्ती ३५, नाला खोलीकरण दुरुस्ती १५, विहीर पुनर्भरण ८१ ठिबक, तुषार २७८९ या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com