Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : इसापूर प्रकल्पातून चार पाणीपाळ्या मिळणार

Rabi Season : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nanded News : आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून १५ ऑक्टोबर रोजीच्या इसापूर धरणातील ८०९.३८ दलघमीनूसार ८३.९५ टक्के जीवंत पाणीसाठ्यावर आधारीत उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेऊन, रब्बी हंगामात चार पाणीपाळ्या देण्याचे नियोजित आहे.

प्रकल्प क्षेत्रातील सर्व लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहित कालावधीत सादर करून, जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले.

प्रतिवर्षी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नाही.

यामुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व इसापूर धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज भरून ३१ ऑक्टोबर पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील.

हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहित नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी ता. ५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

रब्बी हंगाम मधील पाणीपाळीचा कार्यक्रम

आवर्तन क्र. १ दिनांक ५ नोव्हेंबर पासून २५ नोव्ह्रेंबर पर्यंत कालावधी २० दिवस असेल. आवर्तन क्र. २ दिनांक ५ डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत कालावधी २० दिवस. आवर्तन क्र. ३ दिनांक ५ जानेवारी २०२४ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत कालावधी २० दिवस. आवर्तन क्र. ४ दि. ५ फेब्रुवारी २०२४ ते २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कालावधी २० दिवस राहील. पाऊस व आकस्मिक कारणांमुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Damage : देशातील २.४९ लाख हेक्टरवरील पिकांना अवकाळी आणि गारपीटीचा फटका; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी दिली मदतीची ग्वाही

Farmers Protest Warn: पंधरा दिवसांत मागण्या मान्य करा, अन्यथा राज्यभर आंदोलन पेटणार

Irrigation Care After Use: हंगामानंतर सिंचन संच बंद करण्यापूर्वीच्या ३ महत्त्वाच्या स्टेप्स

Sugarcane FRP Dues: पाच हजार कोटींची ‘एफआरपी’ न दिल्यास अवमान याचिका: राजू शेट्टी

Solar Pump Scheme: सौर कृषी पंपाचे नुकसान झाल्यास किती वर्षे मोफत दुरुस्ती, नियम काय सांगतो?

SCROLL FOR NEXT