Jalna Silk Industry: भूमिपूजन झाल्यापासून तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठेच्या स्वतंत्र इमारतीच्या लोकार्पणाला मुहूर्त मिळाला आहे. सिरसवाडी रोडवरील जागेत उभारलेल्या या इमारतीचे आज (ता. १२) सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे..जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१८ मध्ये तत्कालीन वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारातून प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील पहिली रेशीम कोष बाजारपेठ सुरू करण्यात आली होती. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या ऑक्टोबर २०१७ मधील शासन निर्णयानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जालना येथे स्वतंत्र रेशीम कोष बाजारपेठ उभारण्यासाठी ६ कोटी १३ लाख रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती..Sericulture Success Story: पाणलोटामुळे रेशीम शेतीला चालना.त्यानुसार १ सप्टेंबर २०१९ रोजी इमारत उभारणीचे भूमिपूजन झाले. सुमारे दोन वर्षांपूर्वी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र वीजजोडणी आणि फर्निचरच्या कामासाठी निधी शिल्लक नसल्यामुळे पुढील काम रखडले होते. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेतून वीजजोडणी आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. ही कामे पूर्ण झाल्याने आता इमारतीचे लोकार्पण होत आहे. या लोकार्पणामुळे गेली सात वर्षे प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ आता स्वतंत्र आणि सुविधायुक्त इमारतीत स्थानांतरित होणार आहे..दोन टन क्षमतेचा ‘कन्व्हेअर हॉट एअर ड्रायर’नव्या बाजारपेठेत रेशीम कोष ‘ड्राय’ करण्यासाठी दोन टन क्षमतेचा ‘कन्व्हेअर हॉट एअर ड्रायर’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना कोष ‘ड्राय’ करून त्यांची साठवणूक करता येणार आहे. शेतकऱ्यांसाठीही ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः पावसाळ्यात रेशीम कोषांना अपेक्षित दर मिळत नसल्यास शेतकऱ्यांना कोष ‘ड्राय’ करून साठविता येतील. त्यानंतर बाजारात चांगला दर मिळत असताना ते विक्रीस आणण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे रेशीम विभागाने सांगितले..Solapur Silk Market : राज्यातील चौथ्या रेशीम बाजारपेठेचा सोलापुरात प्रारंभ.१५ जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातूनही कोषांची आवकजालना रेशीम कोष बाजारपेठेत आतापर्यंत जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोलीआज, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सातारा, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, अकोला, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रेशीम कोष विक्रीसाठी आणले आहेत. काही वेळा मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांकडूनही जालना बाजारपेठेत कोष विक्रीसाठी आणल्याचीही नोंद आहे..सात वर्षांत १५४ कोटींची उलाढालगेल्या सात वर्षांत जालना रेशीम कोष बाजारपेठेत एकूण ३,२७५ टन रेशीम कोषांची विक्री झाली आहे. या व्यवहारातून १५४ कोटी ४७ लाख रुपयांची उलाढाल झाली. या कालावधीत सुमारे ३७ हजार ८७१ शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील व्यवहारात सहभाग नोंदविल्याची माहिती रेशीम विभागाने दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.