Soybean Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issue : शेतकऱ्याला शेतीपासून दूर राहणं शक्य आहे का?

Maharudra Mangnale : सोयाबीनची रास झाल्यानंतर मी म्हटलं होतं की, पुढचा खरीप हंगाम सुरू होईपर्यंत आता शेतीत काहीच करणार नाही. म्हणजे शारीरिक आणि मानसिक ही नाही.

महारुद्र मंगनाळे

सोयाबीनची रास झाल्यानंतर मी म्हटलं होतं की, पुढचा खरीप हंगाम सुरू होईपर्यंत आता शेतीत काहीच करणार नाही. म्हणजे शारीरिक आणि मानसिक ही नाही. अपवाद फक्त झाडांच्या देखभालीचा. त्याची अंमलबजावणी सुरू केली. शेतीत काय चालू आहे हे मुद्दाम जाणून घ्यायचं नाही.(तरीही ते दिसतं,कळतंच..पण माहित नाही असं समजायचं. सल्ला विचारला की सांगायचं,तुम्हीच निर्णय घ्या. सविता,नरेश,गजानन तिघांनी काय ते ठरवायचं..त्याला माझा पाठिंबाही नाही आणि विरोधही . थोडक्यात तुमचं तुम्ही बघा.मी या गोष्टींमध्ये माझं डोकं घालणार नाही...मी फक्त माझ्या जगात राहणार...

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिवाळ्याच्या सुरूवातीचा काळ माझ्यासाठी थोडा त्रासदायक असतो.पहाटे चार-पाच ते सकाळी ऊन पडेपर्यंत सर्दीचा त्रास होतो.यावर इलाज म्हणजे नाकाला गार वारा लागू द्यायचा नाही.म्हणजे रूमबाहेर पडायचं नाही. आज सकाळी नेहमीप्रमाणे पाचला जाग आली पण साडेसात वाजता उठलो. विहिरीवर चक्कर मारली.विहिरीत चांगलं पाणी आहे सध्या. ट्रँक्टर चालवत असलेल्या नरेशनं सांगीतलं, सध्या उपसेल तेवढं पाणी येतयं.त्यामुळं ज्वारी पेरतोय...

तिथून बाहेरच्या रानात,शेततळ्यावर फिरून हटवर आलो.हळद,तुळस,गुळाचा काळा चहा बनवून उन्हात खुर्ची टाकून बसलो.अर्धा तास फोनवर मित्रांशी बोलत चहा पिला.नऊ वाजता नवेलीत येऊन तासभर व्यायाम केला.व्यायामासोबत शेतकऱ्यांचे फोन चालूच होते.दहा वाजता हटवर जाऊन पेंडखजूर,पेरू,केळी आणि चिवडा असा बहुरंगी नाष्ता आरामात केला. साडेदहा वाजता नवेलीत मच्छरदाणीत येऊन वाचत बसलो. सहज विचार आला,असं निवांत जगण्यासाठी तर मी इथं आलोय.मग गेल्या तीन महिन्यातील ती प्रचंड पळापळ कशासाठी ?

खरं तर त्याचं उत्तर मला माहितच आहे.शेतकरी ही बिरूदावली आहे तोपर्यंत हे असंच चालणार. ती काढली की,हे सगळं थांबतं...मी मनात म्हटलं, शेतकरीपण पूर्णपणे सोडणं कठीण आहे. पण हंगामी शेतकरी बनणं हा मध्यममार्ग बरा राहील.खरीप हंगामापुरतं शेतीत लक्ष घालायचं,पुन्हा काहीच बघायचं नाही. त्यामुळं तसंही इथं काही कोणाचं अडत नाही... फक्त बागेत बघायचं...https://www.youtube.com/watch?v=a0idbLckuNE

मला वाटतं हा निर्णय माझ्यासाठी सोयीचा आहे.शिवाय सध्या मी शेतीत काहीच काम करणार नसलो तरी,मुक्तरंग मध्ये भरपूर काम आहे. बीडहून लातूरला पोचलेला पूर्ण दिवस कामात गेला.काल नरेशला मदतीला मुद्दाम बोलावलं होतं.तरीही आम्हा तिघांना काम संपवायला रात्री आठ वाजले.कदरून गेलो होतो.

म्हणजे रुद्रा हट किंवा मुक्तरंग दोन्हीपैकी एका ठिकाणी काम असणारचं! या दोन्ही ठिकाणी काम नको असेल तर पर्यटनाला जाणे हाच पर्याय उरतो! आज अनेक दिवसांनंतर हे असं निवांणपण अनुभवताना वाटतयं...शेतकरी ही बिरूदावली कायमची भिरकावून देणं जमेल का ? कधी?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT