Irrigation Department Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Department : वाशीमचे पाटबंधारे कार्यालय हलवले शेगावला

Agriculture Irrigation : पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या वाशीम कार्यालयाकडे पुरेसा कार्यभार नसल्याचे दर्शवून हे कार्यालय वाशीमवरून बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Washim News : पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या वाशीम कार्यालयाकडे पुरेसा कार्यभार नसल्याचे दर्शवून हे कार्यालय वाशीमवरून बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्याचा सिंचन अनुशेष शिल्लक असताना शासनाचा हा निर्णय जिल्ह्यावर अन्याय करणारा असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आता हे कार्यालय जिगाव प्रकल्प पाटबंधारे मंडळ, शेगाव या नावाने कार्यान्वित करण्यात आले आहे. वाशीम पाटबंधारे प्रकल्प मंडळ वाशीम या मंडळ कार्यालयाच्या अंतर्गत असलेले कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, कारंजा जिगाव प्रकल्प पाटबंधारे मंडळ शेगाव कार्यालयाशी जोडण्यात आले आहे.

तर कार्यकारी अभियंता वाशीम पाटबंधारे विभाग व कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे विभाग (बांधकाम) ही कार्यालये बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळांतर्गत जोडण्यात आले आहेत. जलसंपदा विभाग २३ ऑक्टोबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार हे स्थानांतर करण्यात आले आहे.

अविकसित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वाशीममधील महत्त्वाचे मंडळ कार्यालय काही नेत्यांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हव्यासापोटी शासनाच्या मदतीने पळविले आहे. या बाबीचा लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. सिंचन अनुशेषामध्ये असलेल्या वाशीम येथून हे मंडळ कार्यालय हलविण्याचा शासन निर्णय रद्द करा, अशी मागणी वाशीम जिल्ह्यातून होत आहे.

वाशीम पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालाय शेगाव येथे हलवून शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. शासनाला प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ नाही. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करण्यास वेळ आहे. याविरोधात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
- माणिकराव गंगावणे, विभागीय कार्याध्यक्ष, विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT