Vitthal Rukmini Mahapuja Invitation Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2024 : शासकीय महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

Invitation of Vitthal Rukmini Mahapuja : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार या महापूजेचे निमंत्रण मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथे जाऊन देण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : पंढरपूरची यंदाची आषाढी यात्रा १७ जुलै रोजी पार पडणार आहे. या दिवशी पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार या महापूजेचे निमंत्रण मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथे जाऊन देण्यात आले.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह मंदिर समितीच्या अन्य सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या सह्याद्री अतिथिगृहात भेट घेऊन हे निमंत्रण दिले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते वीणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचाही सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोईसुविधांबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. आषाढी यात्रा कालावधीत दर्शन रांग, पत्राशेड, दर्शन मंडप, येथे येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या आवश्यक सोईसुविधांची तसेच यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे या बाबत केलेल्या नियोजनाची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT